शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन-लोकप्रतिनिधी संघर्ष प्रगतीच्या मुळाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:36 IST

‘वरं जनहितं ध्येयम्’ हे पुणे महापालिकेचे ब्रीदवाक्य आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था याच ब्रीदवाक्यानुसार काम करतात. जनतेचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या नगरसेवकांनी जनहिताची जपणूक करणे, हे त्यांचे कर्तव्यच.

- विजय बाविस्कर‘वरं जनहितं ध्येयम्’ हे पुणे महापालिकेचे ब्रीदवाक्य आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था याच ब्रीदवाक्यानुसार काम करतात. जनतेचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या नगरसेवकांनी जनहिताची जपणूक करणे, हे त्यांचे कर्तव्यच. त्याचबरोबर लोकसेवक या नात्याने प्रशासन चालविताना अधिकाºयांनीही लोकसेवा करणे अपेक्षित. यातून खटकेही उडतात. प्रशासनातील कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये संघर्ष उडतो; पण तो जनतेच्या हिताचा असतो. दोन्ही यंत्रणा एकमेकींवर अंकुश ठेवण्याचेच काम करतात.पुणे महापालिकेत सध्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पुण्यातील २४ तास पाणीपुरवठा योजना असो की स्मार्ट सिटीचे प्रकल्प यामुळे वाद उद्भवत आहेत. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याविरोधात आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे आरोप सुरू केले आहेत. या मुद्यावर त्यांनी समर्थक नगरसेवकांच्या बैठका घेतल्या. थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कॅग आणि न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि नगरसेवकच एखाद्या प्रकल्पाबाबत साशंक असतील तर मग नागरिकांनी कुणाकडे पाहावे? अशा वेळी सत्ताधाºयांनी समोर येऊन नागरिकांना आश्वस्त करणे आवश्यक आहे. पण अधिकारी बोलणार नाहीत आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीही टीका करीत राहणार, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिमा मलीन होत आहे. यापूर्वीही पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक यांच्यात संघर्ष झाला होता. तोट्याच्या गर्तेतील पीएमपीला बाहेर काढण्याचे आव्हान त्यांनी पेलले आणि पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यात यश मिळविले. वेगवेगळ्या निमित्तांनी राजकारणी व त्यांच्यात वाद होत राहिला. कर्मचाºयांचे निलंबन, अधिकाºयांची पदावनती यामुळे हे वाद वाढत गेले. पूर्वी पीएमपीमध्ये एका बसमागे नऊ कर्मचारी होते. मुंढे यांनी हा आकडा पाचपर्यंत आणला. खासगी कंपन्यांच्या गाड्यांच्या वापरावर शिस्त आणून बंधने घातली. त्यातून पीएमपीचा खर्च कमी झाला व नफ्याकडे वाटचाल सुरू झाली. सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वच महापालिका मदत करतात. संचालन तूट देतात. परंतु संचालन तूट होण्यासारखी परिस्थिती निर्माण करायची आणि नंतर ‘ती देतो’ म्हणून राजकारण्यांनी दबाव आणायचा, यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा चालूच शकणार नाही. जेव्हा जनहिताचा ठेका केवळ आपणच घेतला आहे, असे काही जण समजू लागतात, तेव्हा गोंधळ उडतो व गदारोळ होतो. तेव्हा उडणारा गोंधळ व निर्माण होणारा गदारोळ ते प्रगतीचे गतिरोधक ठरतात. कोणत्याही सार्वजनिक संस्थेमार्फत चालविले जाणारे सार्वजनिक उपक्रम हे अनेकांसाठी कुरणच असतात. वेगवेगळ्या लिलाव प्रक्रिया, कंत्राटे यांतून निर्माण झालेले हितसंबंध यातून राजकीय दबावही वाढत जातो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाला ही ‘अर्थपूर्ण’ किनार तर नाही ना, हेदेखील तपासून पाहायला हवे. सभागृहाचा वापर हा संकेत पाळून जनहिताच्या कामासाठीच व्हावा, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवे़

टॅग्स :Puneपुणे