शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अध्यात्म - बेचैनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:54 IST

बेचैनीत जगतो आपण. म्हणजे कायम नाही पण जगतो खरे. एखादी क्षुद्र घटना, एखादा अपघात, एखादा हळवा स्पर्श, हलकी सर, झुळझुळता मुलायम आवाज, एखादी हाक आणि एखादा कटाक्ष सारेच आपल्याला बेचैन करते. ही बेचैनी निसर्ग, मानवनिर्मित, यंत्राची, तंत्राचीही असू शकते.

- किशोर पाठकबेचैनीत जगतो आपण. म्हणजे कायम नाही पण जगतो खरे. एखादी क्षुद्र घटना, एखादा अपघात, एखादा हळवा स्पर्श, हलकी सर, झुळझुळता मुलायम आवाज, एखादी हाक आणि एखादा कटाक्ष सारेच आपल्याला बेचैन करते. ही बेचैनी निसर्ग, मानवनिर्मित, यंत्राची, तंत्राचीही असू शकते. निसर्ग क्रूर आणि हळवा हलकाही असतो. तो एकालाच करतो असा नाही. एखादाच माणूस निसर्गात झेलपांडतो असं होत नाही. तो त्या त्या जागेतील समूहाला परिणाम करतो. मानवनिर्मितही दोन प्रकारात गणले जातात. एक व्यक्तिगत आणि दुसरा समूहासाठी. मग ती एक प्रार्थना असो, ललकार असो, पुकार असो, आव्हान असो वा आवाहन तो समूहालाच झपाटतो. यंत्र आणि तंत्रही असेच. ते वाटेला गेलात तर झोंबलेच. वायरकडे बघत राहा तासन्तास. ती निपचित पडून राहते; पण तिला स्पर्श करा करंट बसलाच समजा. शॉक बसतो म्हणजे निसर्गातच ठासून व्यवहार आणि परिणाम भरून राहिलाय. त्यातून त्याची वा तिची भाषा कळत नाही. कळली तरी बेचैनी, कळत नाही म्हणून बेचैनी. परमेश्वर भेटत नाही म्हणून बेचैनी तो वारंवार भेटला तरी. एखादी व्यक्ती झपाटून आवडते. वाटत नाही तो वा ती आपली इतकी होऊ शकते. ती, तो कोण असतो आपला? कुणी नाही आणि सर्वस्व होऊन बसतो. ह्यातूनच कथा जन्म घेतात. मग पुन्हा बेचैनी, मिळाले तरी किंवा भेटत नाही म्हणून! मग तो सूर्यास्त वा सूर्योदय होतो. एक मार्गदर्शक, मेंटॉर, तत्त्वज्ञ, विचारवंत होतो. नकळत आपल्या आयुष्याचा भाग होतो. शेंगदाणा जमिनीतून उपटून घेताना त्याला माती लागून येते. बटाटा, कांदा असो माती येतेच सोबत. ती माती त्या पदार्थाचं भाग्य असतं. खरं तर मातीशी असलेलं एवढंच नातं पण तीही सुटण्याची बेचैनी देऊन जाते. ही बेचैनी जेवढी घट्ट तेवढी ती वस्तू आपली आपलीशी होते. कायम जवळ असावीशी वाटते. म्हणून प्रत्येक दु:ख आणि सुखासोबतच उगवत असते बेचैनी तीही वाढते, फोफावते, विस्तारते. ती एकतर पूर्ण आनंद नाहीतर हुरहुर, असोशी, एकटेपणा. सगळे मानवी विकार ह्या बेचैनीत आहेत. म्हणून ती हवीही आणि नाहीही. बघा ना कुणीसं म्हणतं तुझं काहीतरी पडलंय, लगेच शोध सुरू... तशी बेचैनी, बघा, सापडतंय का?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या