शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ॲक्टिव्ह युथनेशिया आणि पॅसिव्ह युथनेशिया : यात फरक काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:18 IST

सक्रिय दयामरणामध्ये रुग्णाचा मृत्यू होईल अशी थेट कृती केली जाते, तर निष्क्रिय दयामरणात रुग्णाला जिवंत ठेवणारे उपचार थांबविले जातात.

युथनेशिया म्हणजे इच्छामरण किंवा दयामरण होय. एखाद्या व्यक्तीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहन कराव्या लागणाऱ्या तीव्र वेदनांमधून तिची सुटका करण्यासाठी तिला जाणीवपूर्वक मृत्यू देणे, तिचे जीवन संपविणे म्हणजे युथनेशिया. 

ग्रीक भाषेतील ‘यू’ अर्थात चांगला आणि ‘थानातोस’ म्हणजे मृत्यू या दोन शब्दांच्या मिश्रणातून युथनेशिया हा शब्द तयार झाला आहे. एखाद्या व्यक्तीला असाध्य आजाराने ग्रासले असेल, त्याच्या आजारावर उपलब्ध असलेले सगळे उपचार करून झाले असतील आणि ती व्यक्ती बरी होऊन पूर्ववत निरोगी आयुष्य जगू शकेल अशी शक्यता नसेल तर अशावेळी त्या रुग्णाची वेदनांमधून सुटका करण्यासाठी इच्छामरण मिळावे अशी अपेक्षा केली जाते. अर्थात गेली अनेक वर्षे इच्छामरणाला कायदेशीर परवानगी असावी म्हणून जगभरातील कार्यकर्ते लढा देत आहेत. असं असलं तरी मेडिकल एथिक्स, मानवता अशा अनेक मुद्द्यांवर अजूनही इच्छामरण समाजमान्य नाही. 

इच्छामरण आणि दयामरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार मानले जातात. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्हणजेच सक्रिय आणि निष्क्रिय. सक्रिय दयामरणामध्ये रुग्णाच्या वेदना संपवण्यासाठी त्याचा मृत्यू होईल अशी थेट कृती केली जाते. या प्रकारामध्ये डॉक्टर त्या रुग्णाला एखाद्या प्राणघातक औषधाच्या जास्त प्रमाणातील डोसचे इंजेक्शन देतात. थोडक्यात त्या रुग्णाचा जाणीवपूर्वक मृत्यू घडवून आणला जातो. त्यामुळेच हा युथनेशिया किंवा अशा प्रकारचे दयामरण वादग्रस्त ठरते. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यावर कायदेशीर प्रतिबंध आहे. काही देशांमध्ये मात्र कठोर नियमांचे पालन करून, असे दयामरण देण्यास परवानगी आहे.

याउलट निष्क्रिय किंवा पॅसिव्ह युथनेशिया हा प्रकार आहे. या प्रकारामध्ये रुग्णाला जिवंत ठेवणारे उपचार एक तर थांबविले जातात किंवा तसे उपचार सुरू करणेच टाळले जाते. त्यामुळे त्या रुग्णाला नैसर्गिकपणेच मृत्यू येतो. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची किंवा फीडिंग ट्यूब देणे, जाणूनबुजून रुग्णाला जिवंत ठेवणारी औषधं देणे या गोष्टी बंद करणे किंवा त्या सुरूच न करणे हा निष्क्रिय युथनेशिया मानला जातो. या प्रकारात रुग्णाला विशिष्ट उपचार न मिळाल्यामुळे पुढे जाऊन त्याचा मृत्यू होणारच आहे हे गृहित धरले जाते. उपचारांमुळे त्याला वेदना होणार असतील तर त्या टाळणे असाही या प्रकाराचा उद्देश असतो. सहसा रुग्णाच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या जवळच्या कुटुंबाच्या संमतीने हे करणे योग्य समजले  जाते. 

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल देत १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा या तरुणाचा व्हेंटिलेटर काढण्यास परवानगी दिली. हरीश सध्या ३२ वर्षांचा आहे. १३ वर्षांपूर्वी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तो पडला. तेव्हापासून तो कोमात आहे. त्याच्या या अवस्थेला वैद्यकीय परिभाषेत इररिव्हर्सिबल पर्मनंट व्हेजिटेटिव्ह स्टेट असे म्हटले जाते. 

अशा रुग्णाचे व्हेंटिलेटर काढण्यास परवानगी देणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अशा प्रकारचा हा पहिलाच निकाल आहे. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरण्याच्या मूलभूत अधिकाराचा आधार घेतला आहे, मात्र असे असले तरी दयामरण योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक याबाबत समाजात असलेले मतप्रवाह टोकाचे आहेत. रुग्ण हक्क, मानवता या दृष्टीनेही त्याबाबत विचार केला जातो. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे हे चित्र काहीसे बदलण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Active vs. Passive Euthanasia: Understanding the Key Differences

Web Summary : Euthanasia, or mercy killing, comes in active and passive forms. Active involves directly ending life, while passive withholds life-sustaining treatment, allowing natural death. India's Supreme Court recently allowed ventilator removal for a patient in a vegetative state, sparking debate on the right to die.
टॅग्स :delhiदिल्ली