शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उशीचं कव्हर आणि ८० वर्षे प्रेमाची प्रतीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:33 IST

पतीची आठवण म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी एका उशीचं कव्हर आपल्या उराशी बाळगलं होतं. हे त्याच उशीचं कव्हर होतं, जे त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या पतीनं आणलं होतं...

चीनची डू हुझैन ही महिला. १०३ वर्षांचं आयुष्य जगलेल्या या महिलेची कथा सध्या सगळ्यांना अस्वस्थ आणि भावुक करते आहे. नुकतंच त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची ही कहाणी व्हायरल होते आहे. तब्बल ८० वर्षांच्या एका प्रदीर्घ प्रतीक्षेच्या या कहाणीनं अनेकांचे डोळे पाणावले आहेत. नियतीनं आपल्यापासून दूर नेलेल्या पतीची गेल्या आठ दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी वाट पाहिली. पतीची आठवण म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी एका उशीचं कव्हर आपल्या उराशी बाळगलं होतं. हे त्याच उशीचं कव्हर होतं, जे त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या पतीनं आणलं होतं.डू हुझैन आता या जगात नाहीत, पण त्यांची प्रेमकथा यापुढेही अनेक काळ लोकांच्या स्मरणात राहील. दक्षिण-पश्चिम चीनच्या गुइझू प्रांतात ८ मार्च रोजी त्यांचं निधन झालं. १९४० मध्ये हुझैन यांचं लग्न झालं. पती हुआंग जुन्फू यांच्यापेक्षा तीन वर्षांनी त्या मोठ्या होत्या. लग्नानंतर लगेचंच काही दिवसांत हुआंग कुओमिंतांग सैन्यात दाखल झाले आणि युद्धावर निघून गेले. युद्धावरून ते परत येतील म्हणून हुझैन यांनी पतीची बरीच वाट पाहिली, त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला, त्यासाठी सरकार दरबारीही त्यांनी प्रयत्न केले, शेवटी त्यांनी आपल्या पतीला शोधून काढलंच. त्यासाठी तीन वर्षं त्यांना संघर्ष करावा लागला. युद्धानिमित्त जुन्फू ज्या ठिकाणी होते त्याठिकाणी त्या पोहोचल्या. त्यांच्याबरोबर काही काळ त्यांनी तिथे घालविला, पण गर्भवती झाल्यानंतर त्या पुन्हा घरी परतल्या. १९४४ मध्ये त्यांना मुलगा झाला. हुआंग फचांग त्याचं नाव. त्यानंतर जुन्फूही घरी परत आले. पण, सैन्यातली नोकरी म्हटल्यावर त्यांना पुन्हा बोलावणं आलं. त्यांना जावंच लागलं. यानंतर मात्र ते पुन्हा कधीच घरी परत आले नाहीत. तिथून ते पत्नीला पत्र पाठवायचे, तिची ख्यालीखुशाली विचारायचे.. निदान पत्रानं का होईना, पण आपल्या पतीची भेट होते, याचाही हुझैन यांना आनंद होता. त्याही त्यांना पत्र पाठवायच्या. घरी परत या म्हणून विणवायच्या. पत्रापत्रीचा हा सिलसिला काही काळ चालू राहिला; मात्र १५ जानेवारी १९५२ रोजी तोही थांबला. त्या दिवशीचं त्यांचं शेवटचं पत्र. त्यानंतर जुन्फू यांचं ना एकही पत्र आलं, ना त्यांची कधी भेट झाली. आपला नवरा कधी ना कधी परत येईल म्हणून हुझैन रात्रंदिवस त्याच्या वाटेकडे डोळे लावून राहिल्या.जुन्फू जी पत्रं हुझैन यांना पाठवायचे, त्यावरून त्यावेळी असा अंदाज लावला गेला की ते मलेशियामध्ये असावेत. आपण कुठे आहोत, याचा उल्लेख मात्र जुन्फू यांनी कधीच आपल्या पत्रात केला नाही. पतीची वाट पाहत हुझैन दिवसभर शेतात काम करत. संध्याकाळी सँडल आणि कपड्यांवर वीणकाम करून घर चालवत. त्यांच्या कुटुंबानंही जुन्फूला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पदरी लहान मूल, पुढे आयुष्य पडलेलं, त्यामुळे हुझैन यांनी दुसरं लग्न करावं म्हणूनही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विनंती करून पाहिली, पण हुझैन प्रत्येक वेळी म्हणायच्या, ‘जुन्फू पुन्हा परत आले तर?’ दरम्यानच्या काळात शिक्षक झालेल्या त्यांच्या मुलानंही २०२२ मध्ये जगाचा निरोप घेतला, पण हुझैन यांनी नवऱ्याची प्रतीक्षा सोडली नाही.. अंतिम क्षणीही त्यांच्या ओठी जुन्फू यांचंच नाव होतं आणि हातात उशीचं तेच कव्हर !

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टchinaचीन