शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानेच करावे चिंतन !

By किरण अग्रवाल | Updated: October 13, 2018 07:44 IST

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या काही आमदार व खासदारांचे कामकाज समाधानकारक नसल्याने ते ‘डेंजर झोन’मध्ये आल्याचे म्हटले जात आहे

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या काही आमदार व खासदारांचे कामकाज समाधानकारक नसल्याने ते ‘डेंजर झोन’मध्ये आल्याचे म्हटले जात आहे, परंतु ही असमाधानकारकता संबंधित व्यक्तींना जशी धडकी भरविणारी आहे तशी ती भाजपासाठीही संकेतात्मक असल्याने खुद्द या पक्षानेदेखील आत्मपरीक्षण करण्याची गरज अधोरेखित होऊन गेली आहे. विशेषत: भाजपाचा भर नेहमीच चिंतनावर राहात असल्याचे पाहता, क्रियाशील नसलेल्या (नॉन परफार्मर) प्रतिनिधींमुळे त्या-त्या मतदारसंघात पक्षच अडचणीत येण्याची शक्यता चिंतेचीच म्हणायला हवी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आपल्या पक्षाच्या १२१ आमदारांसह १६ खासदारांच्या मतदारसंघात दिल्लीतील एका खासगी संस्थेकडून त्रयस्थपणे सर्वेक्षण करवून घेत, संबंधितांच्या कामकाजाचे रिपोर्ट कार्ड तयार करवून घेतले. यात ४० टक्के म्हणजे, सुमारे पन्नासेक आमदारांचे काम खूपच निराशाजनक आढळल्याने ते ‘डेंजर झोन’मध्ये आल्याची चर्चा रंगली आहे. राज्यातील सहा खासदारांचे कामही समाधानकारक नसल्याचे निष्कर्ष या सर्वेक्षणाअंती काढण्यात आले असून, आता उर्वरित वर्षभराच्या कालावधीत संबंधितांनी कामकाज न सुधारल्यास त्यांच्या उमेदवाऱ्या धोक्यात आल्याचे अनुमान बांधले जात आहे. वस्तुत: पक्ष कुठलाही असो, विद्यमानांची उमेदवारी कापणे हे आज म्हटले जाते तितके सहज सोपे राहिलेले नाही. त्यामुळे संबंधितांवर उमेदवारीबाबत टांगती तलवार लटकविण्याखेरीज यातून काही वेगळे घडून येईल याची अपेक्षाच करता येऊ नये. दुसरे म्हणजे, बघता बघता चार वर्षे निघून गेलीत. ज्यांना या चार वर्षांत काही करता आले नाही ते उरलेल्या वर्षभरात काय करून दाखवणार हादेखील प्रश्नच ठरावा. काम करण्यासाठी ऊर्मी व प्रज्ञा असावी लागते. पाचातले चार सेमिस्टर नापास होणारा विद्यार्थी, पाचवी परीक्षा भलेही पास होऊ शकतो, पण त्याने एकूण परीक्षेतील उत्तीर्णता निश्चित होत नाही, तसे आहे हे.

महत्त्वाचे म्हणजे, चाळीस टक्के आमदारांचे काम समाधानकारक नसेल तर त्याकडे त्या त्या व्यक्तींचे काम म्हणून पाहण्याबरोबरच पक्षाचे काम म्हणूनही पाहायला हवे. म्हणजे, व्यक्तीसोबत पक्षाचे अपयशही स्वीकारले जायला हवे. उद्या संबंधितांनी त्यांचे काम सुधारले नाही तर उमेदवा-या बदलल्या जातीलही, परंतु सत्ताधारी असूनही कामे करता न आल्याने त्या त्या मतदारसंघांतील विकास पाच वर्षे मागे पडल्याची वा रखडल्याची भरपाई कशी व्हावी? अशा स्थितीत उमेदवार बदलणे ही पक्षाची सुधारणात्मक क्रिया असू शकते, परंतु भ्रमनिरास झालेल्या मतदारांनी बदललेल्या उमेदवारासह त्याचा पक्षही बदलण्याची प्रतिक्रिया नोंदविली तर ते गैर कसे ठरावे? थोडक्यात, पक्ष भलेही उमेदवार बदलू शकेन; परंतु मतदारांच्या हाती पक्षच बदलण्याचा पर्याय आहे. आपल्या ‘नॉन परफार्मर’ प्रतिनिधींमुळे भाजपानेच चिंतन व चिंता करणे गरजेचे होऊन बसले आहे ते म्हणूनच.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस