शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

लॉकडाउनच्या बेरोजगारीत यंत्रणा स्तरावर शुन्य कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 12:16 IST

रोजगार हमी योजना : ग्रामपंचायत स्तराच्या ४०४ कामांवर १८९२ मजूर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनच्या बेरोजगारीच्या काळात शासनाच्या यंत्रणांनी रोजगार हमी योजनेचे एकही काम अजुनपर्यंत सुरु केले नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़कोरोनामुळे लॉकडाउन केल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ महानगरांमध्ये रोजगार बंद झाल्याने हजारो कामगार, कष्टकरी कुटूंब आपआपल्या गावाकडे परतले आहेत़ या सर्व मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता़कोरोनामुळे विस्कटलेली राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काही उद्योग, व्यवसाय, रोजगार आणि शेतीची कामे सुरू करण्याची घोषणा गेल्या महिन्यात शासनाने केली होती़ जिल्हा प्रशासनाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या़ पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील महानगरांमध्ये गेलेले हजारो स्थलांतरीत कामगार जिल्ह्यात आपआपल्या गावात परतले आहेत़ लॉकडाउनमुळे महानगरांमध्ये रोजगार बंद झाल्याने गावात मोलमजुरी करुन पोट भरता येईल या आशेने ते परतले़ परंतु लॉकडाउनचा फटका ग्रामीण भागातही बसला आहे़ रोजगार मिळत नाही़ हजारोंच्या संख्येने आलेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याच्या सूचना केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यातच दिल्या़ जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नियोजनही केले़ रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी कामे सुरु करण्यांसदर्भात ग्रामपंचायत स्तरावर तसेच यंत्रणेतील विभाग प्रमुखांशी पत्रव्यवहार केला़ त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरु झाली़ परंतु यंत्रणा स्तरावर एकही काम सुरू झालेले नाही़ यंत्रणेतील विभाग प्रमुख प्रतिसाद देत नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे़ त्यामुळे रोहयो विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करावा लागत आहे़पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम रोहयो विभाग, जलसंधारण विभाग, वनीकरण, सामाजिक वनीकरण, कृषी या यंत्रणांनी अजुन एकही काम सुरु केले नसल्याने ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे़ या मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे तक्रारी देखील वाढल्या असून त्वरीत कामे सुरु करण्याची मागणी होत आहे़रोहयो उप जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी पत्रव्यवहार करुन ग्रामपंचायत स्तरावर कामांची संख्या वाढवली आहे़ एप्रिल महिन्यात १२९ कामांवर ६५६ मजुरांची उपस्थिती होती़ आता आठ मेपर्यंत ४०४ कामांवर एक हजार ८९२ मजुरांना रोजगार मिळाला आहे़ ग्रामपंचायत स्तरावर कामांची संख्या चार पटीने वाढली आहे़धुळे तालुक्यात शंभर कामांवर ४७८ मजुरांची उपस्थिती आहे़ साक्री तालुक्यात १५९ कामांवर ६९६ मजूर, शिंदखेडा तालुक्यात ७७ कामांवर ४४२ मजूर आणि शिरपूर तालुक्यात ६८ कामांवर २७६ मजुरांना काम मिळाले आहे़ ग्रामपंचायत स्तरावरील जलसंधारणाच्या कामांचा त्यात समावेश आहे़ इतर कामांची संख्या जास्त आहे़परंतु ही कामे वैयक्तीक लाभाची म्हणजे सिंचन विहिरी आणि घरकूल योजनांची कामे असल्याने यात कुटूंबातीलच सदस्यांचे जॉब कार्ड असते़ त्यामुळे गरजू मजुरांना फारसा रोजगार मिळत नाही़यंत्रणेतील विविध विभागांनी रोहयोची विकास कामे सुरु केली तर त्यात मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असतो़ त्यामुळे यंत्रणा स्तरावर त्वरीत कामे सुरु करण्याची मागणी होत आहे़आदेश त्वरीत कामे सुरू करण्याचे४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे राज्याचे आयुक्त रंगणायक यांनी गेल्या महिन्यात सर्व जिल्ह्यातील रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेवून कामे सुरू करण्याचे आदेश दिले होते़४त्यानुसार रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी यंत्रणांना पत्रव्यवहार करुन कामे सुरू करण्याचे कळविले होते़ परंतु महिना झाला तरी कामे सुरू झाली नसल्याने पुन्हा पत्रव्यवहार केला़४दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी सर्व तहसिलदारांची बैठक घेवून आपआपल्या तालुक्यात कामे सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ संबंधित तहसिलदार तालुका पातळीवर यंत्रणांच्या विभाग प्रमुखांच्या बैठक घेवून कामे सुरु करण्याचे नियोजन करणार आहेत़४कृषी विभाग आणि वन विभागाच्या कामांचे प्रस्ताव तयार आहेत़ त्यांच्यासह इतरही विभाग त्वरीत कामे सुरु करणार आहेत़प्रत्येक तालुक्यात कामे सुरु करण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या आहेत़ त्वरीत कामे सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे़- गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो

टॅग्स :Dhuleधुळे