शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

विद्यार्थी प्रश्नांवर युवा सेना आक्रमक

By admin | Updated: March 2, 2017 00:48 IST

पारोळा चौफुली येथे चक्काजाम : शासकीय तंत्रनिकेतन, कृषी विद्यापीठ प्रश्न अधिवेशनात मार्गी लावा

धुळे : कृषी विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतन व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध प्रश्नांवर आक्रमक आंदोलन युवा सेनेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. वरील प्रश्न येत्या अधिवेशनात तत्काळ मार्गी लावावेत, या मागणीसाठी कृषी महाविद्यालयासमोरील पारोळा चौफुली येथे युवा सेनेच्या वतीने बुधवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. प्रलंबित प्रश्नांचे काय?कृषी विद्यापीठाचा प्रलंबित निर्णय मार्गी लावून हे विद्यापीठ धुळ्यात झाले पाहिजे. शासनाने शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. हा निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा, तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्रासाठी देवपूरमधील सर्व्हे नं.१११ व ११२ या जागेचा ठराव फेटाळण्यात आला आहे. याचा युवा सेनेतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. उपकेंद्रासाठी पुन्हा ठराव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.एवढी जागा कुणाकडेच नाहीदेवपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनकडे भरपूर जागा उपलब्ध आहे. एवढी जागा कोणत्याही शासकीय तंत्रनिकेतनकडे नाही. त्यामुळे हे तंत्रनिकेतन बंद न करता या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू करावे. यासंदर्भात लेखी आदेश तत्काळ प्रशासनाला पाठवावेत, अशी मागणी केली.यापुढे तीव्र आंदोलनजिल्ह्याचा विकास करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, येणाºया पिढीला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रलंबित शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत. येत्या ६ तारखेपासूनच्या अधिवेशनात हे प्रश्न घेऊन मार्गी लावावेत. प्रश्न मार्गी न लावल्यास शासनाच्या विरोधात भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येईल. तसेच वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमक आंदोलने करण्याचा इशाराही देण्यात आला.  या वेळी जिल्हा युवा अधिकारी पंकज गोरे, युवती अधिकारी ऐश्वर्या अग्रवाल, शहर युवा अधिकारी संदीप मुळीक, देवपूर अधिकारी हरीश माळी, उपशहर युवा अधिकारी मनोज जाधव, जितेंद्र पाटील, आकाश शिंदे, मनीष पाटील अमित खंडेलवाल, नितीन मराठे, दीपक देसले, विभाग अधिकारी स्वप्नील सोनवणे, नीलेश चौधरी, अमोल पटवारी, खुशाल ठाकूर, भूषण चौधरी, नैलेश ऋणवाल, महाविद्यालय अधिकारी मयूर बागुल, पराग कुलकर्णी, बिपीन बडगुजर, अजिंक्य मराठे, विनायक आवळकंठे, योगेश मराठे, सागर मोरे, युवा         सेना पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.