लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील वाघाडी ब़नाक़ुंभार विद्यालयात वृक्ष लागवड सप्ताहात जनजागृती व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले़पर्यावरण संवर्धन सप्ताहानिमित्त शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमानिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले़ वाघाडी विद्यालयातील हरित सेना, ब.ना. कुंभार गुरुजी विद्यालय, व्ही.व्ही.रंधे सेमी इंग्लिश स्कूल, शिरपूर येथील वनविभाग, दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या, शिरपूर येथील पर्यावरण मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाषनगरचे सरपंच विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला़सुरूवातीला पालखीचे पूजन वाघाडी सरपंचा उज्वला प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी.बुवा, पं.स.सदस्य किशोर माळी, शिरपूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल खैरनार, वनपाल पी. एच. माळी, वनरक्षक ए.एस. सूर्यवंशी, बोरसे, पर्यावरण मित्र संघटनेचे सचिव दिनेश बोरसे, सुभाष नगरचे उपसरपंच बारकू पारधी, वाघाडी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीराम माळी, माजी सरपंच उमाकांत पवार, माजी उपसरपंच विनायक देवरे, कृषी सहाय्यक शांताराम पाटील, प्रगतिशील शेतकरी शरद देशमुख, राजेंद्र शिसोदे, किरण गोसावी, दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या युगंधरा पवार, वैष्णवी अहिरे, अश्विनी चौधरी, नेहा गांगुर्डे, तेजस्विनी महिरे, देवयानी बावस्कर, वैष्णवी देवरे, मोनिका समशेर, मुख्याध्यापक एल.एस. पाटील, पर्यवेक्षक एस.पी.बोरसे आदी उपस्थित होते. पालखी पूजन करून गावातून झांज पथकासाहित मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी युगंधरा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन डी.व्ही.देवरे तर आभार एस.एस.पाटील यांनी मानले.
तहाडी जि.प. शाळेत दप्तर व साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:42 IST