पूर्ववैमनस्यातून दोंडाईचात तरुणावर ‘रॉड’ने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 10:28 PM2020-09-07T22:28:05+5:302020-09-07T22:28:42+5:30

जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार

The young man was attacked by a rod in Dondaichat out of prejudice | पूर्ववैमनस्यातून दोंडाईचात तरुणावर ‘रॉड’ने हल्ला

पूर्ववैमनस्यातून दोंडाईचात तरुणावर ‘रॉड’ने हल्ला

googlenewsNext

धुळे : पूर्ववैमनस्यातून तरुणा लोखंडी बारीक रॉड आणि धारदार ब्लेडने हल्ला करीत जखमी केल्याची घटना दोंडाईचा गावात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी सोमवारी पहाटे ५ वाजता चार जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़
दोंडाईचा येथील ठाकूर गल्लीत राहणारा विलास लक्ष्मण ठाकूर (२६) या तरुणाला फोन करुन डीआरबीओडी हायस्कूलसमोरील रोडावर बोलावून घेतले़ याठिकाणी विलास हा रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आल्यानंतर त्याच्यात आणि संशयितांमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने त्याच्यावर धारदार ब्लेड आणि बारीक लोखंडी रॉडने हल्ला चढविण्यात आला़ यात त्याच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली़ तो खाली पडल्यावर त्याला हाताबुक्याने मारहाण करण्यात आली़ मारहाण केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले़ परिसरातील नागरिकांनी विलास याला तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले़ प्राथमिक उपचार केल्यानंतर विलास ठाकूर याने दोंडाईचा पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित विराज कृष्णा गिरासे व त्याच्या सोबत तीन जणं अशा चौघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: The young man was attacked by a rod in Dondaichat out of prejudice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे