शिरपूर
दी शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलमध्ये शाळेच्या प्रांगणात योग शिक्षक जयवंत ठाकूर यांनी योग अभ्यासाचे तसेच यम, नियम, आहार यांचे महत्व सांगितले़ मनोज खैरनार, मंगेश ठाकूर यांनी विविध योग प्रात्यक्षिके केली. उपप्रचार्या अनिता थॉमस व योग शिक्षिका आराधना दुबे यांनी महिला शिक्षिका समूहात विविध योग प्रात्यक्षिके केली. या प्रसंगी प्राचार्य निश्चल नायर, उपप्रचार्या अनिता थॉमस, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आर.सी.पटेल विद्यालय
येथील आर.सी.पटेल विद्यालयातील १० योगशिक्षकांनी तीन गटात विद्यालयातील ९० शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून योगाभ्यास करवून घेतला. यावेळी मुख्याध्यापक पी़ व्ही. पाटील, पर्यवेक्षक एन. चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते.
वरूळ
येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योग शिक्षक एऩ.एस़. ढिवरे यांनी विविध योग प्रात्यक्षिके याप्रसंगी केलीत. .प्राचार्य पी.आर.साळुंखे, मंगला पाटकर, सुनील पाटील, एस.के.पाटील, डी़.ए़.जाधव, आऱ.ए़.माळी, एस़.सी़.शिंपी, मनोज पाटील, ए़.बी़. महाजन, रासेयो प्रमुख आर.आर. रघुवंशी, डी़.एऩ.माळी, बी़.एस़. बडगुजर, पी़.टी़.पवार, बापू भिल, राजू सोनवणे आदी सहभागी होते.
सावळदे-
येथील आर.सी.पटेल विद्यालयात मुख्याध्यापक के.आर.जोशी एस.आर. बोरसे, एस़एस.चौधरी, व्ही.एस. बेलदार, सी.जी.पाटील, वाय़पी़ पाटील, डी.व्ही.जावरे, शिरसाठ, रोकडे आदी उपस्थित होते.
भामपूर-
येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात योग शिक्षक एस.एस़ पाटील यांनी विविध योग प्रात्यक्षिके सादर करून शिक्षकांकडून आसने, प्राणायाम आणि ध्यान धारणा याप्रसंगी करुन घेतले. या योग अभ्यासात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एन.पी. देवरे, व्ही.बी.पाटील, एस.डी.पाटील, व्ही.बीग़ाढवे, बी.एस.पावरा, डी.व्ही.ठाकरे, डी.टी.चित्ते, माहेश्वरी आदी सहभागी होते.
तांडे
श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचालित तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सैनिकी शाळेत क्रीडा समन्वयिका ज्योत्स्ना जाधव, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी योग दिवसाचे महत्व सांगून विविध आसने व प्राणायाम करवून घेतले. प्राचार्य दिनेशकुमार राणा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अहिल्यापूर
आर.सी. पटेल विद्यालयात योगशिक्षक आर.पी.जोशी यांनी ॲानलाइन मार्गदर्शन केले. योगवर्गाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक ए.एच. जाधव व जी.पी.पटेल यांनी तर यशस्वितेसाठी पी. के. पाटील, डी.बी.तडवी, बी.ओ. वाघ, के. व्ही.अहिरे, एच.एस.गवळी, बी. जे.गायकवाड, वाय.डी.पाटील, निलेश राजपूत व वसंत थोरात यांनी प्रयत्न केले.
टेकवाडे
येथील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य सिद्धार्थ पवार यांनी योगाचे शरीर व मानसिक स्वास्थ्यासाठीचे महत्व सांगितले. ए.जे.पाटील , पर्यवेक्षक के. एस. मराठे, एस.बी.पाटील, एस. आर.सपकाळे, एस.एम.पाटील, जे. व्ही. पाटील, ए.एस.पाडवी, एस. पी. महाजन, पी.ए.कोळी, बी.व्ही. मोरे, के. ए.गोपाळ, आर.आर. गोपाळ, एस.आर.जाधव, एम.व्ही.चव्हाण, आर.डी.ठाकरे, संतोष कोठवदे, योगेश कुमावत, आर.डी.ठाकरे आदी उपस्थित होते.