कवी कुसुमाग्रजांना भेटण्याचा आला योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:48 AM2021-02-27T04:48:27+5:302021-02-27T04:48:27+5:30

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंतीचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या आठवणीतील एक क्षण या विषयावर जेष्ठ कवी जगदीश देवपूरकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी ...

Yoga came to meet the poet Kusumagraj | कवी कुसुमाग्रजांना भेटण्याचा आला योग

कवी कुसुमाग्रजांना भेटण्याचा आला योग

googlenewsNext

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंतीचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या आठवणीतील एक क्षण या विषयावर जेष्ठ कवी जगदीश देवपूरकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावरील असलेले शिरवाडे वणी येथे वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म झाला हाेता. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवण्याचे कार्य आयुष्यभर केले.

कवी कुसुमाग्रज धुळे महानगरात दोन वेळा येऊन गेले आहेत. एकवेळा का.स. वाणी प्रगत अध्ययन केंद्रात तर दुसऱ्यांदा धाराशिवकर यांच्या सार प्रतिष्ठाच्या कार्यक्रमात भेट दिली होती.

धुळ्यातील पुरुषोत्तम पाटील आणि अमळनेरचे साहित्यिक वा.रा. सोनार यांच्यामुळे मला कवी कुसुमाग्रज यांना भेटण्याचा योग मिळाला होता. माझ्या काव्यसंग्रहाला देखील कवी कुसुमाग्रज यांनी प्रस्तावना दिलेली आहे आणि ते मी माझे भाग्य समजतो. धुळ्यातील अनेक पुस्तकांना प्रस्तावना देण्याचा कुसुमाग्रजांचा हात सर्वांच्या पाठीशी असायचा. साहित्य आणि साहित्यिकांना घडविणारे सर्वांना चांगले लिहिते करणारे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र हाेऊन गेल्याची माहिती जेष्ठ कवी जगदीश देवपूरकर यांनी दिली.

Web Title: Yoga came to meet the poet Kusumagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.