शिरपूर तालुक्यात ७ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:32 PM2020-02-16T12:32:32+5:302020-02-16T12:32:57+5:30

१८ फेब्रुवारीपासून सुरुवात । इंग्रजी विषयाचा पहिला पेपर, ३९२२ विद्यार्थी प्रविष्ठ

XII examination will be held at 4 centers in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यात ७ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरात ३ तर ग्रामीण भागात ४ असे ७ परीक्षा केंद्रावर १२ वीच्या परीक्षा येत्या १८ तारखेपासून सुरू होत आहे़ त्यासाठी ३ हजार ९२२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़ पहिला पेपर इंग्रजी भाषेचा आहे़
शिरपूर ‘अ’
शहरातील एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात शिरपूर ‘अ’ केंद्र असून इंग्रजी भाषेपासून पेपरला सुरूवात होत आहे़ १८ रोजी एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात विज्ञान शाखा बैठक क्रमांक एसओ-३४४५३ ते एसओ-३५०७८ असे ६२५, वाणिज्य शाखेचे एस-१५१९०४ ते एस-१५२०३७ असे १३३, सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयात कला शाखेतील एस-१०३३७२ ते एस-१०३९२६ असे ५५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़
२० रोजी मराठी भाषेच्या पेपर एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात विज्ञान शाखा एसओ-३४४५३ ते एसओ-३५०७८ असे ६२५, वाणिज्य शाखेचे एस-१५१९०४ ते एस-१५२०३७ असे १३३, सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयात कला शाखेतील एस-१०३३७२ ते एस-१०३९२६ असे २२९, वाणिज्य शाखेतील एस-१५१९०४ ते एस-१५२०३७ असे ५६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़
१८ व २० या दोन दिवसाची बैठक व्यवस्था वगळता उर्वरीत सर्व विषयांची परीक्षा एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात होणार आहे़ केंद्र संचालक म्हणून ए़एस़ मराठे, उपकेंद्र संचालक व्ही़एच़ चव्हाण, रेखा पातुरकर, के़पी़ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
शिरपूर ‘ब’
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नासिक यांच्यामार्फत होणाऱ्या एच.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२० साठी शहरातील आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक ४७५ (ब) येथे १८ पासून परीक्षेला सुरू होत आहे. या केंद्रावर पुढील प्रमाणे बैठक क्रमांक आहेत. विज्ञान शाखा- एसओ ३५०७९ ते एसओ ३५८४७ असे एकूण ७७० विद्यार्थी, कला शाखा एस-१०३९२७ ते एस-१०४००८ एकूण ८२ विद्यार्थी, वाणिज्य शाखा एस-१५२०३८ ते एस-१५२१०९ एकूण ७२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत़
या केंद्रावर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील ९२४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत़ शिरपूर ‘ब’ केंद्रावर प्राचार्य आर.बी. पाटील हे केंद्रसंचालक म्हणून काम पाहत आहेत.
शिरपूर ‘क’
शहरातील निमझरी नाक्याजवळील आऱसी़ पटेल इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इमारतीत शिरपूर ‘क’ केंद्र आहे़ या शाळेत कला शाखेतील एस-१०४००९ जे एस-१०४१६० असे १६२ तर विज्ञान शाखेचे एसओ-३५४४८ ते एसओ-३६१८२ असे ३३५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत़
या शाळेत आऱसी़ पटेल इंग्लिश स्कूल, एम़आऱ पटेल सैनिकी स्कूल तांडे, आश्रमशाळा वाघाडी, निमझरी, आश्रमशाळा शिरपूर, खर्दे व दहिवद येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय असे ७ शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे़ १८ फेब्रुवारीपासून ते १४ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ तर दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेदरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत़ केंद्र संचालक म्हणून व्ही़आऱ सुतार, उपकेंद्र संचालक सचिन पाटील हे काम पहाणार आहेत़
तसेच ग्रामीण भागात थाळनेर येथील जे़ए़ पटेल विद्यालयात ३४५ केंद्र संचालक म्हणून नरेंद्र पाटील, थाळनेर येथील संत गाडगे महाराज विद्यालयात १९४ केंद्र संचालक शामकांत ठाकरे, तºहाडी येथील शाळेत २०० केंद्र संचालक नितीन पाटील तर अर्थे येथील शाळेवर ४५८ विद्यार्थी असून केंद्र संचालक म्हणून रविंद्र महाजन हे काम पाहणार आहेत़

Web Title: XII examination will be held at 4 centers in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे