शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

पहाटेपर्यंत सुरु होते न्यायालयीन कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 10:47 PM

जळगाव घरकूल : सर्व संशयित कारागृहात

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणी धुळ्यातील न्यायालयात शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरु झालेले न्यायालयीन कामकाज रविवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनीटांपर्यंत सुरु होते़ कामकाजानंतर सुरेशदादांसह सर्व संशयित आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली़ जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज येथील विशेष न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांच्या न्यायालयात सुरु होते़ बचाव पक्ष आणि सरकारी पक्षांच्या वकीलांची भूमिका जाणून घेतल्यानंतर निकालाची उत्सुकता होती़ शनिवारी निकाल लागणार असल्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्वच संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते़ त्यामुळे पुण्यातील दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पुष्पा पाटील यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने न्यायालय आवारात आणण्यात आले होते़ याशिवाय अन्य आरोपींना व्याधी असूनही ते देखील उपस्थित होते़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास कामकाज असल्यामुळे सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व संशयित आरोपी टप्प्या-टप्प्याने येण्यास सुरुवात झाली़ ते येत असताना त्यांची हजेरी न्यायदान हॉलच्या बाहेर घेऊन त्यांना आणि त्यांच्या वकीलांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता़ बचाव पक्ष आणि सरकारी पक्षातील वकीलांची भूमिका ऐकल्यानंतर दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास सर्वच संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले़ त्यानंतर लागलीच वातावरणात बदल जाणवायला लागला़ अगदी पाणी प्यायला कुठे जायचे असेलतरी त्यांच्या सोबत पोलीस देण्यात येत होता़ कामकाज सुरु असतानाच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांनी सर्व आरोपींना त्यांना लावण्यात आलेल्या कलमानुसार आणि त्यांनी केलेल्या कृत्याप्रमाणे शिक्षा ठोठावली़ जेवणाचे डबे मागविलेन्यायालयीन कामकाज सुरु असताना होणारा वेळ लक्षात घेऊन आणि वेगवेगळ्या व्याधीने त्रस्त असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जेवण मागवू शकतात असे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुपारी जेवणाची सोय टप्प्या-टप्प्याने करण्यात आली होती़ तशीच स्थिती रात्री देखील करण्यात आली़ औषधांची झाली तपासणीजळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज दिवसभर आणि रात्री       उशिरापर्यंत सुरु होते़ परिणामी संशयित आरोपींपैकी बहुतांश जणांना नियमित औषध घ्यावे लागत असल्यामुळे त्यांना औषध पाठविण्याची लगबग रात्री सुरु झाली़ ती त्यांच्या पर्यंत पोहचविण्यापुर्वी त्या औषधांची तपासणी स्थानिक पोलिसांकडून केली जात होती़ पहाटेपर्यंत कामकाजदिवसभरात सुरु असलेले न्यायालयीन कामकाज संपेल असे वाटत असताना मात्र प्रत्यक्षात हे कामकाज रविवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनीटांपर्यंत सुरु होते़कारागृहात रवानगीन्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर सुरेशदादांसह सर्वच आरोपींना टप्प्या-टप्प्याने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी नेण्यात आले़ तपासणी केल्यानंतर त्यांना धुळ्यातील कारागृहात नेण्यात आले़ १०० कोटींचा दंड का आणि कशासाठी 

कलम १७७ : मुद्दाम खोटी माहिती देणे  (६ महिने साधी कैद, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ दिवस साधी कैद)कलम २०१ : पुरावा नष्ट करणे  (३ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम ४०६ : अपहार  (३ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम ४०९ : लोकसवेकाने केलेला अपहार  (७ वर्ष साधी कैद, १०० कोटी रुपये दंड, दंड न भरल्यास ३ वर्ष साधी कैद)कलम ४११ : चोरीची मिळकत विकत घेणे (३ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम ४६५ : बनावट दस्ताऐवज तयार करणे (२ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम ४६८ : फसवणुकीच्या हेतून खोटे दस्ताऐवज तयार करणे (७  वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम ४७१ : फसवणुकीसाठी खोटे दस्ताऐवज तयार करणे (२ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम ४२० : फसवणूक  (७  वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम १३ (१) (ड) : लाचलुचपत प्रतिबंधक कायदा भ्रष्ट मार्गाने स्वत: किंवा अन्य व्यक्तीला फायद्याचा लाभ मिळवून देणे  (७  वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)कलम १२० ब : कट रचणे (गुन्ह्यात हे कलम लावण्यात आले आहे, मात्र शिक्षेत ते घेण्यात आले नाही)

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय