अत्याचाराच्या विरोधात महिला एकवटल्या, दोंडाईचात मुकमोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:49 PM2018-02-20T13:49:21+5:302018-02-20T13:50:18+5:30

अपर तहसिलदार कार्यालयात धडक : दोन दिवसात आरोपीला पकडा, अन्यथा दोंडाईचा बंदचा इशारा

Women's assassination against oppression, litigation in Dondaicha | अत्याचाराच्या विरोधात महिला एकवटल्या, दोंडाईचात मुकमोर्चा 

अत्याचाराच्या विरोधात महिला एकवटल्या, दोंडाईचात मुकमोर्चा 

Next
ठळक मुद्देपीडितेच्या न्याय हक्कासाठी दोंडाईचात मुकमोर्चामुकमोर्चाच्या समारोपानंतर त्याचे रुपांतर आक्रोशमध्ये दोन दिवसात आरोपीला अटक करा़ अन्यथा दोंडाईचा बंदचा इशारा

दोंडाईचा : मन सुन्न करणा-या ५ वर्षीय चिमुकलीवर दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या नुतन विदयालयात अत्याचार करून ती घटना तब्बल १० दिवस दडपल्याच्या निषेधार्ष दोंडाईचा शहरात मंगळवारीअभूतपूर्व मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चामध्ये शालेय विदयार्थीनी आणि महिलांचा मोठा सहभाग होता़
मोर्चेकरी महिलांनी दोंडाईचा येथील अपर तहसिलदार कार्यालयात धडक देत आरोपीला आमच्या ताब्यात द्या, असा आक्रोश केला़ त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती तहसिलदारांना केली. महिला आयोगाच्या सदस्या डॉ. देवयानी ठाकरे व अन्य पदाधिकारी बुधवारी दि. २१ रोजी दोंडाईचा शहरात येवून संबंधीत शाळेत जावून घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दोंडाईचा शहरात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत दि. ८ फेब्रुवारी रोजी चॉकलेटचे आमिष दाखवून ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता़ पीडिताच्या पालकांनी सदर घटनेची संस्थाचालकांना जाणीव करून दिली असतांना देखील त्यांनी हे प्रकरण तब्बत १० दिवस दाबले म्हणून अज्ञात आरोपींसह संस्थाचालक डॉ.हेमंत देशमुख, त्यांचे बंधू डॉ.रविंद्र देशमुख, शिक्षक महेंद्र पाटील, प्रतिक महाले, व नंदू सोनवणे यांच्यावर पीडितांच्या आईच्या तक्रारीवरून जळगांव पोलिसांत रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ सदर गुन्हा जळगांव पोलिसांनी दोंडाईचा पोलिसात वर्ग केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज दोंडाईचा येथील पीडिता राहत असलेल्या महादेवपुरा परीसरात शहरातील महिला, पुरूष, विदयार्थी, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी एकत्रित येवून येथील अपर तहसिलदार कार्यालयावर मुकमोर्चा काढला़ या मोर्चाला महादेवपुरा पासून सुरुवात होवून राममंदिर, अंजुम रोड, स्टेशन भाग, निर्मल एम्पोरीयम, शिवाजी पुतळा, तेथून संस्थाचालक तथा घटनेचे आरोपी डॉ.हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानावरून अपर तहसिलदार कार्यालय येथे नेण्यात आला. याठिकाणी अनेक महिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पीडितांवर अत्याचार करणा-या नराधमांसह या घटनेला दाबणा-यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी निघालेला मुकमोर्चाचे रूपांतर तहसिलदार कार्यालयात चक्क आक्रोश मोर्चात झाले़ याठिकाणी महिलांनी जोरदार आक्रोश करीत अत्याचार करणा-यांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी लावून धरली़ पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगून परीस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, २ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास दोंडाईचा शहर बंद करण्याचा इशारा यावेळी मोर्चेकरांनी दिला.

Web Title: Women's assassination against oppression, litigation in Dondaicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.