जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी.पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तकगाव रानमळा येथे महिला बचतगटाच्या सभासदांसाठी मुक्तसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना भदाणे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रानमळाचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार होते. यावेळी प्रमुख पाहुणे धुळे जिल्हा प्रभाग समन्वयक, अतुल सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य दाभाडे, रवींद्र मालशिकारे, अंतर्गत समूह संसाधन व्यक्ती रानमळा दीपाली कोकणे तसेच २२ बचतगटाच्या महिला सभासद उपस्थित होत्या.
सुवर्णा भदाणे यांनी याप्रसंगी बँकेत खाते कसे उघडले जाते, बँक खात्याचे वेगवेगळे प्रकार, कर्ज मिळण्याची पध्दत, सरकारी बँकेचे व्याजदर याविषयी सविस्तर माहिती दिली आणि खासगी बँकेकडून व्याजदराची होणारी फसवणूक तसेच मायक्रो फायनान्ससारख्या कंपन्या कशा पद्धतीने आपल्या दारात येतात गोड बोलून आपल्याला कर्जे देतात आणि छुप्या पद्धतीने कशी महाभयंकर चक्रवाढ व्याजदर पद्धतीने लूट करतात याविषयी माहिती देऊन महिलांना जागृत केले.
प्रवीण पवार म्हणाले की, बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक सबलीकरण करण्यासाठी मोठी संधी आज उपलब्ध आहे. बचतगटाच्या माध्यमातून कर्ज उभारणी करून गृहउद्योग सुरू करण्यासाठी प्रसंगी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.प्रशांत कसबे यांनी तर आभार प्रा.प्रतीक शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.पवार, उपप्राचार्य प्रा. व्ही एस पवार, डॉ.डी.के. पाटील व डॉ.वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रशांत कसबे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.योगिता पाटील व सहकार्यक्रम अधिकारी प्रा.प्रतीक शिंदे तसेच स्वयंसेवक आदेश सावंत, प्रेम वाकळे, प्रवीण शिंदे, गोरख माळी, कोमल तुपे, नयन पाटील, मिताली सोनार आदींनी परिश्रम घेतले.