आॅनलाइन लोकमतधुळे : राज्यस्तरावरील संशोधन प्रकल्प परिषद अंतर्गत यंदा प्रथमच विद्यापीठ स्तरावरील विभागीय आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी झाली. यातील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. विजेत्यांची विद्यापीठस्तरावर निवड झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड यांच्या संकल्पनेतून या संशोधन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत धुळे, जळगाव, नंदुरबार, नासिक येथील विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील ५५ विद्यार्थी त्यांच्या प्रकल्प प्रतिकृती व भित्तीचित्रासह सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी मानवता भाषा कला, वाणिज्य व्यवस्थापन विधी, विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषध व औषध निर्माण असे सहा विषय गट केले होते. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, डीबाटू अविष्कार स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ. संजय खोब्रागडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात निरीक्षक प्रा. डॉ. गणेश वारखेडे, परिक्षक स्मिता पाटील, अॅड राजश्री पांडे, संजय पडियार, आनंद कुलकर्णी, डॉ. शैलेश पाटील, प्रा. डॉ. मंगल उज्जैनकर, विभागीय स्पर्धा समन्वयक प्रा विनोद शिंदे, प्रा.संगीता राजपूत तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी झाला.गटनिहाय स्पर्धेतील विजेते, उपविजेते असे-मानवता भाषा कला शाखा- प्रियांका पाटील,हर्षदा जाधव.पदव्युत्तर गट- मोनिका राजपूत. वाणिज्य व्यवस्थापन व विधी शाखा-जयकुमार पाटील, ऋषिता राठोड. पदव्युत्तर गट-अक्षता मोमाया, मृणाली पाटील.विज्ञान विभाग-राजेश्वरी घुगे, दिपक सोनवण. कृषी व पशुसंवर्धन गट-प्रविण देवरे व दर्शन बोरसे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखा- राहूल शमा,पुष्कर आशापुरे . पदव्युत्तर गट- प्रिती वडगावकर, रिंकू शर्मा.औषध निर्माण शाखा- कृपाबेन मोदी, रचिता शर्मा.
धुळे येथे झालेल्या ‘आविष्कार’ स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:58 IST