लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यातील वन विभागाच्या क्षेत्रातील ८८ हेक्टर जमिनीवर ७० ते ७२ हजार रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती साक्रीचे आर.एफ.ओ. कैलास सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली आहे.गेली काही वर्षे २ जुलै पासून वृक्षा रोपण सप्ताहाची धामधूम सुरू व्हायची. यंदा पावसाळा लागला आणि ३ आठवडयावर जुलै २ आली आहे.अजून शासनाकडून संस्थांना वृक्षा रोपणाचे उद्दिष्ट आलेले दिसत नाही. मात्र साक्री आणि कोंडाईबारी वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वृक्षारोपणाची तयारी पूर्ण केली आहे. अतिरिक्त वाढीव रोपे तयार असून विविध संस्था,ग्रा पं, सरकारी विभाग यांना ते देऊ शकणार आहेत.गत वर्षी महाराष्ट्रात ३३ कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट होते.यंदा पावसाळा लागला अजूनही शासनाकडून किती वृक्षारोपण करायचे याचे उद्दीष्ट आलेले नाही.साक्रीचे आर.एफ.ओ. कैलास सोनवणे यांनी मात्र जिल्हा नियोजन अंतर्गत पेटले येथे २५ हेक्टर, उभंड येथे दोन भागात प्रत्येकी २५ हेक्टर,महिर वन क्षेत्रात २० हेक्टर मध्ये रोपे लावली जाणार आहेत. एकंदर ७५ ते ९५ हे. क्षेत्रात प्रथम वर्ष रोपवन लागवड करणार असल्याचे म्हटले आहे.कोंडाईबारी रेंजर निकात यांनीही रोपवन लागवडीची तयारी पूर्ण केली आहे.वालव्हे २५ हेक्टर, दिवाळ्यामाळ येथे ३८ हेक्टरमध्ये बांबू लावले जाणार आहेत.सातरपाडा येथील वनक्षेत्रात २५ हेक्टर मध्ये रोपे लावणार आहेत. एकंदर ८८ हेक्टर मध्ये ७०ते ७२ हजार रोपे लागवड उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीसाठी खैर, बांबू, शिसू, करंज, बोर, आवळा, सीताफळ, निंबाची रोपे उपलब्ध आहेत.
८८ हेक्टर जमिनीवर करणार वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:42 IST