खुली जीप फुलांनी सजविली होती. रितेश यांचे शिंदखेडा रेल्वेस्टेशनवर सकाळी दहा वाजता नवजीवन एक्स्प्रेसने आगमन झाले. तिथे त्याचे आई-वडील भाऊ, नातेवाईक व शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातून डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी महिलांनी अंगणात रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी औक्षण केले जात होते. ‘भारत माता की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमत होता, तर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
स्वागतप्रसंगी नगरसेवक सुनील चौधरी, उदय देसले, दीपक अहिरे, माजी नगरसेवक दीपक देसले, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप दीक्षित, प्रा. सोमनाथ अहिरराव यांनी स्वागत केले. मिरवणुकीत जवान रितेश यांचे आई-वडील, नातेवाईक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी रितेश अहिरराव यांच्यासोबत जम्मू -काश्मीरला कार्यरत असणारे दोन मित्र जवान त्याच्या स्वागत सोहळ्यासाठी खास उपस्थित होते.
रितेश यांनी जम्मू काश्मीर, श्रीनगर, गुजरात, राजस्थान, यासह अनेक ठिकाणी सेवा केली आहे.