शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

अमरावती प्रकल्पातून पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST

एप्रिल, मे महिन्यांच्या कडाक्याचे ऊन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती आहे याची जाणीव करून देते. घोटभर पाण्यासाठी जिवाची लाहीलाही ...

एप्रिल, मे महिन्यांच्या कडाक्याचे ऊन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती आहे याची जाणीव करून देते. घोटभर पाण्यासाठी जिवाची लाहीलाही होत असते, तर हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात मालपूरकरांनी रानोवन भटकंती दोन वर्षांपूर्वी केली होती, हे सर्व उदाहरणे ताजे असताना डोळ्यादेखत हे पाणी दररोज वाहून जाताना सर्व सामान्यांचा जीव कासावीस होत आहे, तर पाटबंधारे विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक दिसून येत नाही.

मालपूर परिसरातील पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी हा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर गाव शिवारातील तसेच तालुक्यातील विखरण तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाते. मागील वर्षी तुलनेने कमी पर्जन्यमान झाले तरी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला याला मुख्य कारण पाण्याची केलेली बचत. अन्यथा येथे आज खडखडाट राहिला असता. विखरण तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचा प्रश्नच आला नसता. कारण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणून शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम भागातील प्रत्येक नागरिकाने या पाण्याच्या बचतीकडे लक्ष दिले पाहिजे तरच पावसाळ्यात पाणी सोडण्यासाठी प्रकल्पावर धाव घेता येईल. यामुळे लहानलहान बंधारे भरता येतात व विहिरींना त्यामुळे त्वरित पाझर फुटून शेतशिवार हिरवेगार दिसून येते. या बंधाऱ्याची साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे लगेच कोरडे होतात. या बंधाऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी अमरावती मध्यम प्रकल्पात पाणी असणे गरजेचे आहे. यासाठी ही पाण्याची बचत करणे खूप आवश्यक आहे अन्यथा धरण उशाला व कोरड घशाला लागेल.

या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांच्या मुख्य वितरिका, मुख्य सांडव्यामधून बेसुमार पाणी गळती दिसून येत आहे. ही गळती थांबविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनीदेखील पावले उचलली पाहिजेत. नाहीतर आजचा हिरवा गार शेतशिवार येणाऱ्या वर्षी रणरणत्या उन्हात भाजून निघेल व पुन्हा प्रकाश बुराई उपसा सिंचन योजनेची स्वप्न पडू लागतील. व हातचे सोडून पडत्याच्या मागे धावावे लागेल.