शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

धुळे जिल्हयात गतवर्षापेक्षा पाणी आरक्षणात वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 11:36 IST

 ७०४.९१ दलघफू वाढीव साठा, पुढील वर्षीच्या जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान 

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती७०४.९१ दलघफू वाढीव साठा,जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान 

आॅनलाइन लोकमतधुळे :  पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून यंदा आताच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. परतीच्या पावसाची आशाही मावळली आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात यंदा पाणी आरक्षणाच्या प्रमाणात ७०४.९१ दलघफू एवढी वाढ करण्यात आली. पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत म्हणजे साडेआठ महिने हे पाणी पुरविण्याचे कठीण आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने २ हजार ४६८.६१ दलघफू एवढे पाणी आरक्षित केले होते. यंदा मात्र त्यात वाढ करून मध्यम व लघुप्रकल्पांत मिळून ३ हजार १७३ दलघफू एवढा जलसाठा आरक्षित झाला आहे. जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांत गेल्यावर्षी १ हजार ९९२.०६ दलघफू एवढे पाणी आरक्षण झाले होते. यंदा मात्र त्यात तब्बल १ हजार ४७.२० दलघफूने वाढ करण्यात आली आहे. तर लघुप्रकल्पात गतवर्षी चांगला साठा झाला असल्याने ४७६.५५ दलघफू एवढे पाणी आरक्षित करण्यात आले होते. यंदा मात्र जोरदार पावसाअभावी लघुप्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. त्यामुळे या वर्षी त्यांत केवळ १३४.४५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. गतवर्षी अनेर, अमरावती प्रकल्प वगळता सर्वच प्रकल्पांमध्ये पाणी आरक्षण करण्यात आले होते. यंदा मात्र अनेरमध्ये चोपडा तालुक्यातील नदीकाठी असलेल्या गावासाठी ७० दलघफू एवढे आरक्षण करण्यात आले आहे. अक्कलपाडा प्रकल्पांत यंदा धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांकरीता ७०० दलघफू, वलवाडीसाठी ६६.५७ तर धुळे शहरासाठी ५६५.१९ दलघफू जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. पांझरा (लाटीपाडा) प्रकल्पांत पिंपळनेर पिंपळनेर ग्रा.पं.साठी ५१.९१ दलघफू, काटवान भागासाठी १२५ आणि साक्री तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या २० गावासाठी ५१.१५ दलघफू एवढा साठा राखीव ठेवला आहे. करवंद प्रकल्पांत केवळ शिरपूर शहरासाठी १०० दलघफू एवढा साठा राखीव ठेवण्यात आला आहे.तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये धुळे शहरासाठी ५५४.०९, शिंदखेडा नगरपंचायतीसाठी ४३.२६, शिरपूर पालिका ४० यासह नरडाणा एमआयडीसीसाठी ३५ दलघफू एवढा साठा राखीव झाला आहे. दोंडाईचा पालिकेसाठी सारंगखेडा बॅरेजमध्ये २०८ दलघफू जलसाठा राखीव ठेवला आहे. धुळे तालुक्यातील कनोली प्रकल्पात शिरूड, तरवाडे व बोरकुंड या गावांसाठी, सोनवद प्रकल्पात सोनगीर १८ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी ५५.४४ तर कापडणे ग्रा.पं.साठी ६.६० दलघफू एवढा साठा राखीव ठेवला आहे. बुराई प्रकल्पात निजामपूर-जैताणे पा.पु. योजनेसाठी ३०.६५ दलघफू व दुसाने, बळसाणे, सतमाने, कढरे या गावांसाठी ७२.९३ दलघफू साठा राखीव झाला आहे. जामखेही प्रकल्पात दापूर, जेबापूर, रोहण व सामोडे या साक्री तालुक्यातील केवळ चार गावांसाठी १६.१६ दलघफू साठा राखीव ठेवण्यात आला. मालनगाव प्रकल्पांत साक्री तालुक्यातील कान नदीकाठावरील १६ गावांकरीता ४५.४४ तर साक्री नगरपंचायतीसाठी ६९.१५ दलघफू साठा राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Dhuleधुळे