शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी मातब्बरांना दिला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 23:09 IST

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर,  सर्वच पक्षांनी केेलेल्या दावे-प्रतिदाव्यांमुळे चुरस निर्माण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :     जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली. यात अनेक ठिकाणी मतदारांनी मातब्बरांच्या पॅनलला पराभवाचा धक्का देत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावे केल्याने, चुरस निर्माण झाली असून, आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. धुळे तालुक्यात भाजपाच्या अनेक मातब्बरांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. नेर येथे भाजपचे सरपंच शंकरराव खलाणे,  बोरीस ग्रामपंचायतीत भाजपचे नेते सुभाष देवरे,  शिरूडमध्ये भाजपचे नेते गजानन पाटील यांच्या कालिका विकास पॅनलचा पराभव करीत काॅंग्रेसने सत्ता परिवर्तन घडवून आणले.  शिंदखेडा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व असले तरी तालुक्यात भाजपने ५१ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविल्याचा दावा करण्यात येत आहे. तर कॅांग्रेस १७, शिवसेना १०, व राष्ट्रवादीने ११ जागा मिळविल्याचा दावा करण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यातील ३४ पैकी ६ ग्रामपंचायतीं माघारीपूर्वीच बिनविरोध झाल्याने, २८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर  आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र राष्ट्रवादीनेही नऊ जागा जिंकल्याचा दावा केलेला आहे.साक्री तालुक्यात ग्रामपंचायतीचे निकाल संमिश्र लागले आहेत. साक्री तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री डाॅ. सुभाष भामरे यांचे बंधू भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांनी ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवीत पुन्हा सत्ता काबीज केली.  तालुक्यातील आदिवासी पट्यात कॅांग्रेसने आपले वर्चस्व कायम राखल्याचा दावा करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे