कवडीमोल भावात भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 01:30 PM2020-04-04T13:30:27+5:302020-04-04T13:31:06+5:30

धुळे तालुका : भाजीपाला मार्केट बंद झाल्याने शेतकरी दारोदारी

Vegetable sales at expensive prices | कवडीमोल भावात भाजीपाला विक्री

dhule

googlenewsNext

कापडणे : भाजीपाला मार्केट बंद असल्यामुळे आपला शेतातील भाजीपाला, टरबूज कवडीमोल भावाने घरोघरी जाऊन विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.
भाजी मार्केट बंद असल्यामुळे व्यापारी भाजी खरेदी करण्यास तयार नसल्यामुळे अखेर कापडणे येथील शेतकरी हे आपल्या बैलगाडीवरती कापडणे गावात ग्राहकांच्या घरोघरी जाऊन अत्यंत स्वस्त व कमी भावात शेतातून तोडून आणलेल्या गवारच्या शेंगा विक्री करीत आहेत.
कमी भावात गवार विक्री केल्यामुळे दिवसभराची शेंगा तोडण्याची मजुरी देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकºयांनी आपल्या शेतातून उत्पादित भाजीपाला पीक काढणी करून विक्री कशी करावी व त्याचा मोबदला कशा पद्धतीने मिळवावा या मोठ्या विवंचनेत आता शेतकरी सापडला आहे.
कोरोना मुळे लागलेल्या संचारबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हा मोठ्या नैराश्येच्या छायेखाली वावरत आहे. दररोजच्या चिंतेने शेतकºयांचा तिळतिळ मृत्यू होत आहे.
या गंभीर प्रकाराकडे शासनाने शेतकºयांच्या होणाºया शेतीमालाच्या विक्रीच्या गैरसोय इकडे ताबडतोब लक्ष द्यावे व शेतीमाल विक्री करण्यास मुभा द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Web Title: Vegetable sales at expensive prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे