एकलव्यांनी ज्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारले होते. तो कुत्रा कौरवांचा होता. यामुळे तो कुत्रा जेव्हा तशाच अवस्थेत आश्रमात पोहचला तेव्हा त्या कुत्र्याला पाहून गुरु द्रोणाचार्यांबरोबर त्यांचे शिक्षण घेत असलेले शिष्य (राजकुमार) आश्चर्यचकित झाले.
हा प्रहार कुत्र्याच्या तोंडात करून सुद्धा कुत्र्याच्या तोंडातून रक्ताचा एक थेंबसुद्धा पडला नाही.
एकलव्याला गुरु दक्षिणा सुद्धा मागितली.
त्यांनी गुरु दक्षिणेत एकलव्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा मागितला, जेणेकरून याच्या पुढे तो धनुष्य चालवणार नाही. एकलव्य आपल्या गुरूंचा खूप आदर करीत असे. त्यामुळे कुठलाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून त्याने गुरु दक्षिणा म्हणून तो गुरुंसमोर अर्पण केला.
आपल्या सोबत एवढे सर्व होऊन सुद्धा त्याच्या मनात कधीच निराशेची भावना आली नाही, याउलट त्याने आपल्या चार बोटांनी धनुष्य चालवणे सुरूच ठेवले.
डॉ. तुळशीराम गावीत यांनी मनोगतात सांगितले, आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी झाला. त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतित झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे. तेही वडिलांसोबत रानात जाऊन धर्नुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बिरसा यांनी या नियमांना विरोध करत इंग्रजांविरुद्ध आवाज उठविला ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो, याला २७ वर्षे झाले. आदिवासी शिक्षणाच्या पर्वात आले. विकासाच्या पर्वात आले. आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच शैलेजा देवरे, अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या इंदुबाई मल्हारी गायकवाड होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य राजधर देसले, धनदाई तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, मूर्तिकार रवी सुतार, गोंदूर, एस. एन. देवरे, निरंजन देवरे, अशोक विसपुते, रमेश देवरे,प्यारेलाल पिंजारी, सुभान पिंजारी, रामराव ह्याळीस, अनिल फौजी, विष्णू गायकवाड, प्रवीण गायकवाड, बापू गायकवाड, जयेश गुंजाळ, कृष्णा चिंचवार, राजू सोनवणे, हिरामण अहिरे, रवींद्र माळचे, भरत मोरे,भगवान गायकवाड, चंद्रकांत माळचे,लहू अहिरे, रमेश पवार, भाऊसाहेब गायकवाड, महेंद्र माळचे, अनिल पवार, आण्णा अहिरे, ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हिरामण अहिरे यांनी केले. यावेळी अल्पाेपहार राजधर देसले व सामाजिक कार्यकर्ता गणू महाराज यांच्याकडून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी आपकी जय संघटना, वीर एकलव्य संघटना म्हसदी यांचे सहकार्य लाभले. एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त राजेंद्र देवरे यांनी आभार प्रदर्शन केले.
100821\img_20210810_112839.jpg
फोटो