शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
2
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
3
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
4
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
5
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
6
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
7
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
8
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
9
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
10
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
11
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
12
IND vs PAK : पाकिस्तानच्या खेळाडूंना आता घरी बसवा; भारताकडून पराभव होताच अक्रम संतापला
13
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
14
"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश
15
चंद्राबाबू मुख्यमंत्री होण्यापूर्वी लक्ष्मीची झाली कृपा; कुटुंबाच्या संपत्ती १२ दिवसांत १,२२५ कोटींची तेजी
16
'पाकिस्तानशी युद्ध करावे लागेल...', रियासी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेचें मोठे वक्तव्य
17
मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 
18
...तर आमच्याविरूद्ध फलंदाजी करणं कठीण; पराभव होताच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले...
19
PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
20
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?

वारसा दातृत्वाचा अंध गौरवचा पाणपोई उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:54 AM

वारसा दातृत्वाचा अंध गौरवचा पाणपोई उपक्रम

ठळक मुद्देdhule

-  सुनील साळुंखेशिरपूर शहरातील निमझरी नाक्याजवळील शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी गौरव मोहनदास भामरे (३२) हे अंध असून ते वयाच्या ७व्या वर्षापासून पाणपोईचा उपक्रम राबवित आहे. त्याच्या उपक्रमाला आता २५ वर्ष पूर्ण होत आहे़ विशेष म्हणजे गौरव स्वत:चा वाढदिवस अनाथ, मुकबधीर व गरजु मुलांसोबत साजरा करीत असतो़ दिवाळीत फटाके न फोडता तो गरीब मुलांना फराळ व फटाके देतो़ अशा दातृत्ववान गौरवच्या पाणपोईस दररोज १० थंड पाण्याचे जार लागतात़आपल्या कृतीने समाजासमोर आदर्श ठेवणाºया गौरवने वयाच्या सातव्या वर्षी आपल्या वाढदिवसापासून कडक उन्हात नागरिकांची तहान भागविण्यासाठी सुरूवातीला घराच्या ओट्यावर माठ-रांजण ठेवून एक पाणपोई उघडली, अन् तो स्वत: तहानलेल्यांना पाणी देवून त्यांना तृप्त करु लागला. त्याची ही परंपरा आजही अविरत सुरू आहे़ येथील बस आगारातील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक एमक़े़ भामरे व यशवंत शाळेच्या मुख्याध्यापिका विजया भामरे यांचा तो एकुलता एक मुलगा आहे़ दोन्ही डोळ्यांनी तो अधू आहे़ त्याला दिवसातून ४-५ वेळा फिटही येतात. त्यामुळे वैयक्तिक जीवनात शारीरिक व्याधीने तो दु:खी असला तरीही त्याला सामोरे जावून स्वत:ला आनंद मिळविण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबवित असतो़ फिट येतात तेव्हा तो झाड उन्मळून पडावे तसा कोसळतो़ बºयाच वेळा डोके फुटते पण परोपकाराची कृती आहे म्हणूनच त्याच्या नावाने गौरव फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था त्याच्या पित्याने काढून या माध्यमातून दिव्यांग व निराधार, अनाथांची सेवा सुरू आहे़ वृध्दांसाठी विविध शिबीरे देखील घेतली जातात़स्वत:ला दिवाळीला फटाके फोडता येत नाही, त्याचा मनमुराद आनंद उपभोगता येत नाही म्हणून तो ५०० ते ७०० रूपयांचे फटाके आई-वडीलांना घ्यायला सांगतो अन् गरीब व गरजु मुलांना फटाके फोडावयास लावून आनंद मिळवितो़ शेजारी वा गल्लीत कोणी बालक आजारी पडल्याचे त्याला माहिती पडताच तो बिस्कीटपुडा घेवून त्या आजारी बालकाच्या घरी जाऊन देतो़ स्वत:चा वाढदिवस साजरा न करता गरजूंना जेवण देतो. झोपडीतील मुलांना कपडे वाटप तर कधी मुकबधीर मुलांना गोड जेवण देण्याचा उपक्रम तो राबवित असतो. स्वत:चे दु:ख विसरुन परोपकार करणाºया गौरवची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.

प्रत्येकाची वाढदिवस साजरा करण्याची कल्पना वेगळी असते. अनेक जण धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करतात. गौरव मात्र, आपल्या वाढदिवशी अनाथ, गरजू व भिक्षेकयांना चक्क पार्टी देतो. ती केवळ पंगत नसते तर सामाजिक जाणिवेचे स्पंदन असते.

टॅग्स :Dhuleधुळे