शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पांझरेच्या पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:17 IST

शेत शिवारातील रस्त्यांची वाट : वाळू चोरीला लगाम घालण्यात प्रशासनाला अपयश

म्हसदी : साक्री तालुक्यातील दातर्ती, वसमार येथील पांझरा नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम घालण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच या अवजड वाळुच्या वाहनांमुळे वसमार शेतशिवाराकडे जाण्याची रस्त्याची वाट लागली आहे.दातर्ती, वसमार येथील पांझरा नदीपात्रातील वाळूला मोठी मागणी असते. यामुळे वाळू माफिया नदीपात्रात चांगलाच धूडगूस घालतांना दिसून येतात. पात्रात दिसेल तेथून रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरु आहे. यामुळे पांझरा नदीपात्रात पहावे तेथे मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत.पांझरा नदीपात्रातून विनापरवाना होत असलेल्या वाळू चोरीमुळे पांझराकाठच्या गावातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने पांझराकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदीपात्रातून होणारी ही वाळू चोरी रोखण्यासाठी पांझरा नदीकाठावरील ग्रामस्थांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या आहेत. त्याच बरोबर तलाठ्यांनीही वाळू माफिया आमचे ऐकत नाहीत, कार्यवाही केल्यानंतरही वाळूचा बेसुमार उपसा होतो. यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. मात्र, विनापरवाना होणारी वाळू चोरी रोखण्यात महसूल प्रशासनाला आतापर्यंत यश आले नसल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवरच नागरिकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तालुक्यातील दातर्ती, धमनार, वसमार, म्हसदी येथील पांझरा पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेऊन वाळूमाफिया ही वाळू नाशिक जिल्ह्यांमध्ये पाठवित आहेत. अवैध वाळू उपशाला लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.महसूलच्या हालचालीवर पंटरची नजरमहसूल प्रशानाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वाळू माफियांनी रोजंदारीवर व्यक्ती (पंटर) नेमले आहेत. हे पंटर महसूल प्रशासनाच्या बारिक-सारिक हालचालींची माहिती वाळू माफियांना देत असल्याने वाळूची चोरी वाढली असल्याचे दिसत आहे. तहसील कार्यालय, समोरच्या चहा हॉटेलवर हे पंटर बसलेले असतात. बसस्थानक परिसरातील शेवाळी फाटकाजवळ, धमनार फाटा आदी ठिकाणी पंटरकडून माहिती दिली जात आहे. ही माहिती मिळाल्यास वाळूमाफिया आपली वाळूची वाहने तातडीने इतरत्र हलवित असल्यामुळे कार्यवाहीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनावर हे वाळूमाफिया वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे