शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर बसस्थानकासमोर विना परवानगी दारु विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:48 IST

पोलिसांची कारवाई : अडीच हजाराच्या दारु बाटल्या जप्त

ठळक मुद्देविना परवानगी दारु विक्री शिरपूर बसस्थानकासमोर घटनापोलिसात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकासमोर असलेल्या विना परवानगी दारुची होणारी चोरटी विक्री पोलिसांनी छापा टाकून रोखली़ सुमारे अडीच हजाराचा मुद्देमालही जप्त केला असून एकाविरुध्द गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ या कारवाईचे परिसरात कौतूक होत आहे़ शिरपूर शहरात ठिकठिकाणी चोरट्या पध्दतीने दारुची विक्री सुरु आहे़ सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी  पोलिसांनी पथक तयार केले आहे़ त्यांच्या माध्यमातून छापा टाकत चोरट्या मार्गाने विक्री होणारी दारु पकडली जात आहे़ शिरपूर येथील बसस्थानकाच्या समोर आॅमलेट विक्री करणाºया लोटगाडीच्या अडोश्याला विना परवानी परमीटशिवाय चोरट्या मार्गाने दारु विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली़ तातडीने शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ या छाप्यात ज्ञानेश्वर पंडीत माळी (४१, रा़ वरवाडे ता़ शिरपूर) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने २ हजार ४९६ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या काढून दिल्या़ देशी दारु विक्री करण्याची कोणतीही परवानगी त्याच्याकडे नसल्याचे चौकशीतून समोर आले़ याप्रकरणी लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे यांनी शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित ज्ञानेश्वर माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ व्ही़ एम़ देवरे तपास करीत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा