लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा :भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅँकरने मोटरसायकल जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार व अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात दोंडाईचा-शहादा रस्त्यावर उड्डाणपुलाच्या पुढे रविवारी सायंकाळी झाला.शहादा-दोंडाईचा रस्त्यावर भरधाव जाणाºया आॅईलच्या टँकरने (एमएच ४१-व्ही ५१०६) मोटर सायकलला (एमएच ३४ -अेके ३६९९) जोरदार धडक दिली.त्यात शहादा तालुक्यातील मनरद येथील रहिवाशी व शहादा येथील विकास हायस्कुलमध्ये शिपाई असलेला दीपक साहेबराब भामरे (वय ३०)हा जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला दिनेश पवार जखमी झाला आहे. मयत दीपक याच्या पश्चात आई वडील व एक भाऊ आहे. घटना स्थळी दोडाईचा पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड,उपनिरीक्षक डॉ. संतोष लोले, दिनेश मोरे यांच्यासह संस्थेचे चेअरमन व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि. प . सदस्य अभिजित पाटील आदींनी भेट दिली. दरम्यान मयत दीपक भामरे यास दोडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.टॅँकर पोलिसांनी ताब्यात घेतला केला असून चालक फरार आहे.
टॅँंकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:09 IST