धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर बाभळे फाट्याजवळ ३० जुलै रोजी दुपारी इंडिका कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात लालु काळु पावरा (४४) याचा मृत्यू झाला तर अभिषेक पावरा, कुकेश लालसिंग पावरा हे दोघे जखमी झाले़ तिघेजण पासरीपाडा ता़ शिरपूर येथील रहिवासी आहेत़ ते धुळ्याकडून शिरपूरकडे जात होते़ त्यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या इंडिका (क्ऱ एम़ एच़ १८ डब्लू़ ३२१९) कारवरील चालक पसार झाला़
इंडिकाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 21:17 IST