शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दोन गावठी कट्ट्यासह एकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:30 IST

एकजण फरार : आरोपीची दुचाकी जप्त, शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घटना 

ठळक मुद्देपोलिसांकडून सापळा रचून कारवाई एकास पकडले, एक फरार होण्यात यशस्वी दोन गावठी कट्ट्यांसह दुचाकी असा ५० हजारांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शस्त्र विक्रीसाठी येणा-यास पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याजवळून २० हजार रूपये किंमतीचे दोन गावठी कट्टे, ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा ५० हजाराचा ऐवज जप्त केला. या प्रकरणातील एकजण फरार झाला. ही कारवाई शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत हाडाखेड टोल नाक्याजवळ आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.शिरपूर तालुक्यातून दोनजण शस्त्र विक्रीसाठी धुळ्याकडे येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकातील अवैध अग्निशस्त्र विशेष मोहीम पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहूल सानप यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हाडाखेड टोल नाक्याजवळ सापळा रचला.सायंकाळी विजय रमेश पावरा (रा. दुरबळ्या ता.शिरपूर) याच्यासह अन्य एकजण दुचाकीवर (क्र. एमएच १८-अ‍े.आर.१४३६) हे येतांना दिसले. पोलिसांनी विजय पावरा याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ दोन गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल, दुचाकीसह आरोपीस ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी  घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला.  ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रामकुमार व अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाठ, राहूल सानप, संजय जाधव, मच्छिंद्र पाटील, संजीव जाधव, योगेश दाभाड, राजीव गिते, यांच्या पथकाने केली. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाठ यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा