धुळे- येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल मुंबई येथील आणखी दोघांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. शनिवारी सकाळी एका रूग्णाचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले होते. शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्ह्यातील ९८ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पॉजीटीव्ह आलेले तिघे रूग्ण मुंबई येथील असल्याने त्यांचा जिल्ह्यातील बाधीत रूग्णांमध्ये समावेश होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची संख्या ६६ इतकीच राहणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी हिरे महाविद्यालयातील डॉक्टरचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रूग्णालयातून निरोप देण्यात आला. धुळे शहरातील गल्ली नंबर सहा येथील रहिवासी असलेली व्यक्ती नाशिक येथे पॉजीटीव्ह आढळली होती. त्या रूग्णाने देखील कोरोनावर विजय मिळवला आहे.
मुंबईच्या आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:29 IST