दिवाणमळ्यात मारहाण करुन बळजबरीने एका टोळीने लुटले दोन लाखांचे लोखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 09:05 PM2020-11-14T21:05:51+5:302020-11-14T21:06:16+5:30

लोखंडाच्या सळई बळजबरीने चोरून नेल्याची घटना

Two lakhs of iron were looted by a gang by beating them in the living room | दिवाणमळ्यात मारहाण करुन बळजबरीने एका टोळीने लुटले दोन लाखांचे लोखंड

दिवाणमळ्यात मारहाण करुन बळजबरीने एका टोळीने लुटले दोन लाखांचे लोखंड

Next

धुळे : हाफ पॅन्ट, टी शर्ट तर काहींनी स्वेटर परिधान करुन आलेल्या एका टोळीने वृध्दाला मारहाण केली. त्याच्या ताब्यातील लोखंडाच्या सळई बळजबरीने चोरून नेल्याची घटना धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. चोरुन नेलेले लोखंड हे २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात एका टोळीविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात डी फॉर्मसी कॉलेज आहे. या कॉलेजच्या आवारात बांधकामासाठी लागणारे लोखंड ठेवलेले होते. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी भुरा सुका सोनवणे (७२, रा. दिवाणमळा ता. धुळे) हा वॉचमन म्हणून कार्यरत होता. १३ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील ८ ते ९ जण आले. त्यातील काहींच्या अंगात स्वेटर तर काहींनी हाप पॅन्ट व टी शर्ट परिधान केलेला होता. त्यांनी जवळ येऊन दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने त्याच्या हातातील लोखंडाच्या सळईने उजव्या पायाच्या गुडग्यावर व उजव्या पंजावर मारहाण केली. त्यानंतर एका ट्रकामध्ये लोखंड भरण्यास सुरुवात केली. त्यात ४५ हजार टन प्रमाणे ४ ते ५ टन लोखंडाची सळई असा एकूण २ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. हा सर्व ऐवज ट्रकमध्ये भरुन चोरुन नेला.
जखमी अवस्थेत असलेल्या भुरा सोनवणे यांनी मदतीसाठी हाक मारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. जखमी अवस्थेतच सोनवणे यांना रुग्णालयत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी इम्रान हुसनोद्दीन खाटीक (३०, रा. शिवपार्वती कॉलनी, देवपूर धुळे) यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार भादंवि कलम ३९५, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक एम. आय. मिर्झा तपास करीत आहेत

Web Title: Two lakhs of iron were looted by a gang by beating them in the living room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे