धुळे : वाळूच्या उभ्या ट्रकला टमाट्याने भरलेल्या आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली़ या अपघातात तीन जण ठार तर दोन महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महामार्गावर घडली़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजिक एका हॉटेलजवळ वाळूने भरलेला ट्रक उभा होता़ एमएच १८ एए ८३८४ क्रमांकाच्या आयशरने जोरदार धडक दिली़ या अपघातात अशोक प्रभाकर जगताप, रंगराव भिमराव बाविस्कर आणि चालक बबलू रविंद्र जाधव हे तिघे जागीच ठार झाले़ तर वैशाली रंगराव बाविस्कर, संगिता अशोक जगताप या दोन महिला जखमी झाल्या आहेत़ तर त्याच परिसरात ट्रकने पुढे जात असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडक दिली़ त्यात पंडीत सुरेश सातदिवे (३५, रा़ कन्नड) यांचा मृत्यू झाला़चिमठाणेनजिक ट्रक-दुचाकी अपघात, १ ठारसोनगीर : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणेजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला़ यात सोनगीर येथील हिरालाल सुभाष धनगर (३७) हा तरुण जागीच ठार झाला़ अपघाताची ही घटना दुपारी घडली़ हिरालाल हा चिमठाणेनजिक एका हॉटेलवर कामाला होता़ एमएच १८ एआर ७१८३ या दुचाकीने जात असताना त्याला ट्रकने धडक दिली़
मुंबई आग्रा महामार्गावर दोन अपघातात ४ ठार २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:51 IST