लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : पाण्याने भरलेल्या तलावाची शेती नव्हे तर मल्चिंग पेपरवर ड्रीपच्या साह्याने एकाच वेळेस दोन आंतरपिके घेऊन कापूस व टरबुजाची लागवड शेतकऱ्यांनी केली़ धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात अशी शेती केलेली पहावयास मिळत आहे़ उत्पन्न वाढीसाठी शेतकºयांचा खटाटोप सुरु असून खरीप हंगामात मल्चिंग पेपरचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागलेला आहे़ पारंपारीकसोबतच शेतकºयांनी आता आधुनिकतेची कास धरली आहे़धुळे तालुक्यातील कापडणे गावातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आता मात्र आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत़ शेतकरी तंत्रज्ञानाची कास धरून, शेतीवर आधारित नवनवे प्रयोग करीत आहेत़ कमीत कमी खर्चात व श्रमात जास्तीत जास्त उत्पन्न वाढीसाठी शेतकºयांनी सध्या लक्ष केंद्रीत केले आहे़ याच पार्श्वभूमीवर कापडणे येथील शेतकरी अरुण उत्तम पाटील यांनी कापडणे येथील कौठळ रोड जवळील आपल्या शेतात खरीप हंगाम घेण्यासाठी बेड गादीवाफावर मल्चिंग पेपर अंथरून ड्रीपच्या साह्याने मल्चिंग पेपरच्या एकाच बेड वरती दोन अंतर पिके लागोपाठ प्रत्येकी सव्वा फुटाच्या अंतराने घेतली आहेत़ यात बागायती कापूस पीक लागवड करून याच बेडवरती टरबुज पिकाची देखील लागवड केलेली आहे़ बेड पद्धतीवर मल्चिंग पेपर अंथरून ड्रिपच्या पाण्याद्वारे विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल असून सध्या कापडणे व परिसरात मल्चिंग पेपरच्या साह्याने विविध शेती पिके घेतली जात आहेत़ प्रत्येकी सव्वा फूट अंतरावरती कापूस पिक व नंतर टरबुज पिकाची लागवड केलेली आहे़ ६५ दिवसाचे टरबूज पिक घेतल्यानंतर चार ते पाच महिन्यासाठी कपाशी पीक मल्चिंग पेपरवर घेतले जात असते़ यामुळे शेतात अनावश्यक तन उगवत नाही़ खतांचे नत्र उडत नाही़ जमीन भुसभुशीत राहते़ पिकांच्या पांढºया मुळ्या चांगल्या वाढतात व पिकाची- फळांची उत्पादनाची गुणवत्ता देखील चांगली असल्याने मालाला उच्चांकी भाव मिळतो़
मल्चिंग पेपरवर ड्रिपच्या सहाय्याने एकाच वेळेस दोन आंतरपिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:19 IST