धुळे : शहरातील बारा पत्थर चौकात सोमवारी सायंकाळी दोन आमने सामने आल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गॅरेज चालकाशी झालेल्या वादानंतर हे पडसाद उमटल्याची जोरदार चर्चा रंगली होती. या हाणामारीत एकाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
बारा पत्थर चौकातून जाणाऱ्या एका वाहन चालकाचा त्याच भागातील गॅरेज चालकाशी वाद झाला. या वादातून दोन गट आमने-सामने आले. घटनेचल माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. शहरात जारी असलेल्या निर्बंधामुळे महत्वाच्या चौकात पोलिसांचे फिक्स पाँईट ठेवण्यात आले होते तेथील पोलिसांसह अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या हाणामारीत पोलिसांच्या एका वाहनाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून एकाला दुखापत झाली आहे. या भागात तणावपूर्ण शांतता आहे.