शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन आत्महत्या; दोन वेगवेगळ्या घटना, पोलिसात नोंद

By देवेंद्र पाठक | Updated: January 6, 2024 17:06 IST

दोन वेगवेगळ्या घटनेत वृद्धासह तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

देवेंद्र पाठक,धुळे : दोन वेगवेगळ्या घटनेत वृद्धासह तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. देवल्या होन्या बिलकुळे (वय ६५) आणि रोहित गोरख पाटील (वय २३) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. शुक्रवारी पोलिस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

वृद्धाची आत्महत्या :

साक्री तालुक्यातील बसरावळ येथील देवल्या होन्या बिलकुळे या ६५ वर्षाच्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. राहत्या घरात दारूच्या नशेत छताच्या लोखंडी अँगलला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. घटना लक्षात येताच त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. देवल्या बिलकुळे यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्याने दारूच्या नशेत यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पिंपळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. आर. पिंपळे घटनेचा तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या:

शहरानजिक मोहाडी उपनगरातील राजारामभाऊ नगरात वास्तव्यास असणारा राेहित गोरख पाटील या २३ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. राहत्या घराच्या पुढील रुममध्ये छताच्या कढीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याला तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात रात्री ९ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शिरसाठ करीत आहेत.

दरम्यान, दोघांनी आत्महत्या का आणि कशासाठी केली याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस