लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील वरूळ येथील आऱसी़ पटेल इंग्लीश स्कूलच्या प्रांगणात आर.सी. पटेल मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने २ अत्याधुनिक रूग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार काशिराम पावरा यांच्याहस्ते करण्यात आले़कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल होते़ यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, माजी जि़प़ उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सुभाष कुलकर्णी, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, बाजार समिती उपसभापती इशेंद्र कोळी, पंचायत समिती सदस्य डॉ.शशिकांत पाटील, पंचायत समिती सदस्या विनिताबाई पाटील, जि़प़सदस्य भीमराव ईशी, जयवंत पाडवी, पं़स़सदस्य राहुल पावरा, प्रतिभा भामरे, विनायक पाटील, गोपाल भंडारी, दिलीप पटेल, नामदेव चौधरी, सुदाम भलकार, डॉ़पवन पाटील, जानकीराम गुजर, दीपक गुजर, नरेंद्र मराठे, साहेबराव पाटील, अनिल गुजर, बाळासाहेब पाटील, रवि सावळे, प्राचार्य प्रदीप साळुंखे, मुख्याध्यापिका एलिजाबेथ जानवे आदी उपस्थित होते़याप्रसंगी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन, आभार सुभाष प्रदर्शन कुलकर्णी यांनी केले. या रुग्णवाहिकांचा तालुक्यातील गरजू रुग्णांना लाभ होणार आहे.
दोन रुग्णवाहिकांचे वरुळ येथे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:26 IST