जगदीश सखाराम खंडेराव यांनी ठरल्याप्रमाणे सहा महिन्यांनंतर उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. यासाठी गटनेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल यांच्या मार्गदर्शनानुसार २९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्य व पॅनलप्रमुख यांची बैठक झाली. या बैठकीत तुकाराम पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीला गटनेते महावीरसिंह रावल यांच्यासह पॅनल प्रमुख माजी सरपंच तथा गोपाल दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन श्रावण अहिरे, पोपट बागुल, बारीकराव मोरे, रवींद्र पाटील, किसन गोसावी उत्तम भामरे, ग्रामपंचायत सदस्य, तसेच मावळते उपसरपंच जगदीश खंडेराव, माजी उपसरपंच भारती माळी, कैलास माळी, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, आशाबाई धनगर, अनिताबाई इंदवे, योगिता माळी, लताबाई शिंदे, अजय साळवे, सावित्रीबाई कोळी, भारती वाडिले, रेखा जाधव, रत्ना वाघ, गीताबाई भिल, महेंद्र भिल आदी उपस्थित होते. सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी एल.सी. पाटील यांनी बघितले. त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू भावसार, समाधान धनगर, राजेंद्र पानपाटील, वाॅटरमन शांताराम तावडे, तुकाराम महाजन यांनी सहकार्य केले.
मालपूर उपसरपंचपदी तुकाराम पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST