शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
3
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
5
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
6
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
9
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
10
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
11
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
12
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
13
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
14
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
15
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
16
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
17
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
18
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
19
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
20
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान

एटीएम कोड विचारून दोघांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 00:21 IST

धुळे व निजामपूर : बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी

धुळे/निजापपूर : भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून एटीएमचा कोड मिळवून शहरातील एकासह निजामपुरातील शेतक:यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े त्यात एकाच्या खात्यातून 40, तर दुस:याच्या खात्यातून 85 हजार काढण्यात आल़े याप्रकरणी शहर व निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़शहरातील साक्री रोडवरील श्रीहरी सोसायटीत राहणारे व मिस्तरी काम करणारे दिलीप रतन मिस्तरी यांना गेल्या शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या भ्रमणध्वनीवर 9073296356 या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला़ त्याने आपण बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून मिस्तरी यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची व एटीएम कोडची माहिती विचारून घेतली़ त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 39 हजार 997 रुपयांची ऑनलाइन खरेदी केली़ आपली फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलीप मिस्तरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल करीत आहेत़दुस:या घटनेत साक्री तालुक्यातील छडवेल येथील शेतकरी नाना सदाशिव साळुंखे यांना  भ्रमणध्वनीवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला़ स्टेट बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून तुमचे एटीएम कार्ड बंद होणार असे सांगून पासवर्ड विचारला़ त्यानंतर त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून 14 ते 15 एप्रिल या दोन दिवसात एकूण 85 हजार रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली. साळुंखे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े