धुळे : जल, जंगल, जमिनीचे खरे वारस आदिवासी बांधव आहेत, हे जगाने देखील मान्य केले आहे. आदिवासी बांधवांच्या सन्मानार्थ जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो, असे मत युवा सेनेचे तालुकाप्रमुख आकाश कोळी यांनी येथे व्यक्त केले.
दोंडाईचा शहरात शिवसेना-युवा सेना व जय आदिवासी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवमोगरा माता, भगवान वीर एकलव्य, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत, एकजूट होऊन संघटित राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विक्रम अहिरे, कैलास मालचे, संदीप तिरमले, गणेश ठाकरे, पिंटू मोरे, जितु मालचे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले, तर आभार उपशहरप्रमुख योगेश बोरसे यांनी मानले.
याप्रसंगी राजेश रुपचंदाणी, आबा चित्ते, विजय वाडीले, चुडामण बोरसे, गणेश विसावे, सुरेश कोळी, राकेश पाटील, भूषण चौधरी, विभागप्रमुख किरण कोळी, नरेंद्र धात्रक, ज्ञानेश्वर पवार, युवा सेना शाखाप्रमुख पप्पू धनगर, भैया लोणारी, देवेंद्र अहिरे, नीलेश विसावे आदी उपस्थित होते.