शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:34 IST

डीबीटी पद्धत बंद करण्याची मागणी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाºयांना दिले निवेदन

ठळक मुद्देठिय्या आंदोलनात २५० विद्यार्थ्यांचा सहभागशासनविरोधी दिल्या घोषणाआंदोलनस्थळी अनेकांची भेट

आॅनलाइन लोकमतधुळे :शासनाने आदिवासी मुला-मुलींच्या विभागीय व जिल्हास्तरीय वसतीगृहातील नाश्ता, जेवण बंद करून, ती रक्कम डीबीटी पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पद्धत अन्यायकारक असून ती बंद करावी यासाठी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी, त्यांचे पालक, समाजबांधवांनी आज धुळे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या विभागाचे प्रकल्प अधिकारी आर. आर. हळपे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, शासनाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. २०१८-१९ हे शैक्षणिक वर्ष सुरू होवून अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. परंतु वसतीगृहातील शासकीय खानावळ बंद असल्याने, विद्यार्थी गावी परत जात आहे. शासनाने थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमध्ये मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर किंवा प्रत्यक्ष अनुदान देणे आवश्यक होते. आदिवासी विभागाची संगणकीय प्रणाली बिघडली असल्याने, विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था वसतीगृह व्यवस्थापक करू शकत नाही. विभागीयस्तरावरील आदिवासी विद्यार्थ्यांना ३५०० तर जिल्हास्तरावर ३ हजार रूपये पुरेशे नाहीत. शासनाने तीन महिन्याचे जेवणाचे एकत्रित अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात नवीन विद्यार्थ्यांचे बॅँक खाते उघडणे, नियोजन करणे, शासनाद्वारे बॅँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण करणे यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे वसतीगृह आहार थेट लाभ हस्तांतरण पद्धत तत्काळ रद्द करून, पूर्ववत वसतीगृहातच जेवण उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. आदिवासी विद्यार्थी, पालक व समाजबांधवांनी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. ठिय्या आंदोलनात जवळपास २५० विद्यार्थी, पालक सहभागी झाल्याची माहिती आदिवासी एकता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष रोशन गावीत यांनी दिली. ठिय्या आंदोलनस्थळी आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव दीपक अहिरे, राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या ज्योती पावरा यांनी भेट दिली होती.  

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण