शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
3
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
6
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
7
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
8
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
9
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
10
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
11
Crime: पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न; एका चुकीमुळे फसले!
12
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
13
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
14
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
15
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
16
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
17
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
18
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
19
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
20
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षदिंडीचे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:26 IST

शाळांनी केले आयोजन: विद्यार्थ्यांनी विविध घोषणांचे फलक हातात घेऊन केली जनजागृती, उपक्रमाचे गावकयांनी केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळांतर्फे वृक्षदिंडी काढण्यात येऊन वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली. या वृक्षदिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. मंडलिक विद्या मंदिर,धुळेश्री मयूर शैक्षणिक ट्रस्ट संचलित मंडलिक विद्यालयातर्फे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करून, वृक्ष लागवडीबाबत घोषणा देवून जनजागृती केली. वृक्षदिंडी यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी.टी.देसले, उपाध्यक्ष डी.डी. पाटील, मुख्याध्यापिका विजया मोरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. *लामकानी* तालुक्यातील लामकानी येथील जिल्हा परिषद मुले, कन्या, जि.प. उर्दू शाळा तसेच म.सु.पाकळे माध्यमिक विद्यालय लामकानी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. सुरवातीला वृक्षदिंडीचे उदघाटन मेहेरगाव केंद्रप्रमुख छाया खैरनार व संस्थेचे चेअरमन पुरूषोत्तम पाकळे यांनी केले. या दिंडीत जिल्हा परिषदेचे ४५० व पाकळे विद्यालयाचे एक हजार असे एकूण जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोषाख करून गावातून वृक्षदिंडी काढली. ‘एक मुल एक झाड, झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली. वृक्षदिंडी यशस्वीतेसाठी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुनील सोंजे, जि.प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विजया सोंजे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलेमान अन्सारी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकुंभे, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. *मुकटी*येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जिभाऊ पोपटराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पोपटराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आमदार कुणाल पाटील यांच्याहस्ते झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन गुलाबराव पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती मधुकर गर्दे, नगराज पाटील, व्हा. चेअरमन भटुलाल शर्मा, सुभाष चौधरी, बाजीराव पाटील, भगवान चौधरी, हर्षल साळुंखे, व्ही.एन. सैंदाणे उपस्थित होते. सजविलेल्या पालखीत वृक्ष ठेवून सवाद्य मिरवणूक  काढली. विद्यार्थ्यांनी वृक्षरोपणाबाबत जनजागृती केली. प्राचार्य ईश्वर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. एम.डी. पवार यांनी केले. 

टॅग्स :Dhuleधुळे