शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून महावृक्षालागवड मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:13 IST

३३ कोटी वृक्षलागवड : दह्याणे येथे मोहिमेला सुरूवात ; सहभागी होण्याचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत मध्ये ६५ लाख ७६ हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे़ त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्णत्वास आली आहे़ तालुक्यातील  दह्याणे येथे  सोमवार   सकाळी १० वाजता महावृक्षारोपण अभियानाला प्रांंरभ होणार आहे़  जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने किमान दोन रोपांची लागवड करुन तीन वर्षापर्यंत संगोपन करावे यासाठी  शाळा, महाविद्यालयाच्या आवारात, मोकळ्या भूखंडासह धुळे व नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे़ त्याच प्रमाणे वनहक्क कायद्यांतर्गत दिलेल्या सामूहिक वनहक्क जमिनीवर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे़ग्रामीण भागात प्रात्सोहनजिल्ह्यातील ७५ गांवामधून वृक्षारोपण अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया प्रत्येक गावातून दोन जणांसह स्वयंसेवी संघटनांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान केला जाणार आहे़ तसेच मोकळ्या भुखंडावर वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन व संगोपनासाठी इच्छुकांशी त्रिपक्षीय करार देखील केला जाणार आहे़मोहिमेला २०१७ पासून प्रांरभराज्य शासनाच्या ५० कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात २०१७ मधील पावसाळ्यात करण्यात आली होती़  २०१७ मध्ये ४ कोटी, २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी, तर यंदाच्या पावसाळ्यात ३३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले आहे़ स्थळांची नोंदणीयंदाच्या पावसाळ्यात  वृक्षलागवड करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ४ हजार १५६ स्थळांची नोंद वनविभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे़ त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी  दिलेल्या उद्दिष्टानुसार खड्डे खोदण्याचे काम पूर्ण केले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर ही मोहिम राबविण्यात येणार आहे़  २५ हेक्टरमध्ये लागवडजिल्ह्यात वनविभागाच्या २५ हेक्टर क्षेत्रात ४० हजार रोपांची लागवड करण्यात येईल, असेही उपवनसंरक्षक अण्णासाहेब शेंडगे यांनी सांगितले. नर्सरीत रोपे तयारङ्घ वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात २९ विविध नर्सरीमध्ये विविध प्रजातीची रोपे तयार करण्यात आली आहे. त्यातील अनेक रोप एक ते दीड फूट उंचीची आहे. बोरविहीर, गरताड, नंदाणे, लामकानी, वडेल, सांगवी, आंबा, जोयदा, नागेश्वर, नांदर्डे, करवंद, फारशीपाडा, फत्तेपुर, टेकवाडे, डोंगराळे, दुसाने, आमोदा, पाणखेडा, बारीपाडा, देवशिरवाडे, काळगाव, म्हसदी, सांजोरी  याठिकाणी तयार करण्यात आलेल्या नर्सरीमध्ये ही रोपे आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे