आयटीआय निदेशकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 09:16 PM2020-07-06T21:16:43+5:302020-07-06T21:17:00+5:30

निदर्शने : तासिका तत्वावरील आयटीआय शिक्षकांची सेवा केली समाप्त

Time of starvation on ITI directors | आयटीआय निदेशकांवर उपासमारीची वेळ

dhule

Next

धुळे : आयटीआयमधील तासिक तत्वावरील निदेशकांचे मानधन थकले आहे़ लॉकडाऊन काळाचे मानधनही त्यांना मिळालेली नाही़ त्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़
दरम्यान, नाशिक विभागातील तासिका तत्वावरील निदेशकांची सेवा १ जुलैपासून अनिश्चित कालावधीसाठी समाप्त करण्याचे तोंडी आदेश सहसंचालकांनी दिले आहेत़ त्यामुळे राज्यातील तीन हजार निदेशकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे़
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धुळे जिल्ह्यातील तासिका तत्वावरील निदेशकांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कार्यालयाबाहेर निदर्शने केली़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रणजित भोसले, किरण बागुल, नंदु येलमामे यांच्या नेतृत्वाखाली सौरभ भामरे, अतुल वाधवा, कल्पेश पाटील, हर्षल फुलपगारे, अक्षय सैंदाणे, इरफान शेख आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, सेवा समाप्त करण्याबाबत विचारणा केली असता अभ्यासक्रम संपला असून मानधन देऊ शकत नाही अशी कारणे दिली जात आहेत़ मुळात कोरोनाची आपत्ती आणि लॉकडाऊनमध्ये कुणालाही कामावरुन कमी करु नये, काम बंद असले तरी माणुसकीच्या नात्याने कर्मचाºयांचे वेतन अदा करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी याआधीची केले आहे़ राज्य शासनाच्या सूचना असतानाही शासनाच्या अखत्यारीत येणाºया आयटीआयीमध्येच कर्मचाºयांवर अन्याय होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ विशेष म्हणजे तासिक तत्वावरील हे शिक्षक अजुनही विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाईन शिक्षण देत आहेत़
राज्यभरातील तीन हजार शिक्षकांचा हा प्रश्न अतीशय गंभीर बनला असून त्यांची सेवा समाप्त केली तर हजारो कुटूंब उघड्यावर येणार आहेत़ बेरोजगारी वाढणार आहे़ लॉकडाऊनमध्ये अन्य ठिकाणी काम मिळणेही शक्य नाही़ या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या निदेशकांनी राज्यभर निदर्शने, आंदोलने सुरू केली आहेत़

Web Title: Time of starvation on ITI directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे