शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वेळेचा सद्उपयोग झालाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 22:44 IST

सद्उपयोग करुन अध्यात्मिक प्रगती साधता येईल़

सध्या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य महामारीमुळे संपूर्ण मानवी जीवनास महाआपत्ती आलेली आहे़ आपल्या भारत देशानेही या आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी जे अनेक उपाय केले त्यात एक उपाय म्हणजे संपूर्ण लॉकडाउऩ ही पण एक उपाययोजना आहे़ अशावेळी आपल्या धार्मिक परंपरा, सणवार, उत्सव, नित्यनेम, वारी, यात्रा इत्यादी प्रश्न कसे हाताळायचे? या विषयी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे़ त्याविषयी काही गोष्टी़़़़१) नित्यनेम :- आपण जे काही धार्मिक नित्यनेम करतो ते घरी बसून सहजच करता येतील़ या उलट निवांत वेळ मिळत असल्याने श्री तुकोबारायांच्या शब्दात सांगायचे म्हणजे, ‘‘ठायीच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा़ चिंतनासी न लगे वेळ, सर्वकाळ करावे’’ या उक्तीप्रमाणे वेळेचा सद्उपयोग करुन अध्यात्मिक प्रगती साधता येईल़२) देवदर्शन (वारी) :- याबाबतीत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सोशल डिस्टेंस व आपल्यामुळे कोण्य दुसऱ्यास उपद्रव वा दु:ख हानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे़‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे’या बोधाप्रमाणे (येथे मत्सर या शब्दाचा अर्थ कोणाही विषयी असू या इतरांविषयी सहकार्याची भावना किंव उपद्रव रहित असा घ्यावयाचा) घरीच ईश्वर चिंतन करावे़‘‘प्रपंच वोसरो, चित्त तुझे पायी मुरोऐसे करी गा पांडूरंगा, शुध्द रंगवावे चित्ता’’श्री ज्ञानेश्वरी, गाथा यांचे वाचन, पारायण सहज घरी करता येऊन पारमार्थिक आनंद सहज घेता येईल़३) सणवार :- सणवारही परिवारासह सर्वांनी आनंदाने करता येऊ शकतात़ सर्वजण (घरातील सदस्य) कुळधर्म, कुलाचार एकत्र असा योग क्वचित जुळून येतो़४) सर्व जण घरीच असल्याने घरातील मुलांबाळासह नातवंडांना सकाळ, संध्याकाळ धार्मिक संस्कार करण्याची सुयोग्य वेळ हीच आहे़ सकाळी देवपुजा, स्त्रोत पठन, संध्याकाळी हरिपाठ, रामरक्षा, नारायण स्त्रोत इत्यादी हे सर्वजण मिळून (घरातील परिवारासोबत) म्हणण्यात एक वेगळा आनंद व संस्कार यापेक्षा वेगळा कोणता असू शकेल?५) जनसेवा हीच ईश्वरसेवा :- वरील गोष्टी आपण घरात बसून करीत राहिल्याने आपल्या व जनतेच्या कल्याणासाठी करीत असून अत्यल्प का होईना जनसेवा हीच ईश्वर सेवा या गोष्टीचे समाधान होऊन (पॉझेटिव्ह थिंकींग) निष्क्रीयता न येता वेळेचा सद्पयोग होईल़‘काळ सारावा चिंतेने’अस्तूहभप शंकर महाराजविश्वस्तश्री द्वारकाधीश संस्थान, विखरण (देवाचे) ता़ शिंदखेडा

टॅग्स :Dhuleधुळे