धुळे - गुरूवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत ३० रूग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ३५४ वर पोहोचली आहे. धुळे शहरातील १३ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. शिरपूर येथील तीन तर साक्री येथील सहा व शिंदखेडा तालुक्यातील दोन तर धुळे तालुक्यातील एका रूग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पारोळा येथील तीन रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.
गुरूवारी ३० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:11 IST