बोधगाव बाबरे परिसरात वादळी वाऱ्यासह गारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:39 PM2020-03-20T12:39:04+5:302020-03-20T12:39:29+5:30

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकºयाचे आर्थिक गणित पुन्हा बिघडले

Thunderstorm with hail in Bodhgaon Babre area | बोधगाव बाबरे परिसरात वादळी वाऱ्यासह गारा

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
विंचूर : धुळे तालुक्यात विंचूर परिसरातील बोधगांव बाबरेसह काल बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यात परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नूकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
बेमोसमी पावसामुळे झालेल्या नूकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. यात मका, गहू, हरभरा यासह मका आडवा पडल्याने अधिक नुकसान झाले आहे. खरीप प्रमाणेच रब्बीतही मक्याचे उत्पन्न निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा हिरावल्याने शेतकरी हिरमुसला आहे. शासनामार्फत तातडीने पंचनामा व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी उपसरपंच भिकन पाटील, दिपक पाटील, यशवंत पाटील, सुकदेव महाले, राजेंद्र पाटील यांनी केली आहे यात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील वेल्हाणे, कुंडाणे, बाबरे, धामणगाव, बोधगांव, निमगुळ परिसरात जोरदारपणे वाºयासह पाऊस झाला. काही प्रमाणात गाराही पडल्या असे शेतकºयांनी सांगितले.
दरम्यान, शिरुड, जूनवणे, विंचुर परिसरातही वारा पावसाने याच वेळी हजेरी लावली असता शेतकरीवर्गाची धावपळ उडाली.
तालुका प्रशासनाने संबंधित कर्मचाºयांना तत्काळ नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नुकसान झालेल्या गावकºयांनी केली आहे. यंदा खरीपा सारखेच रब्बीचेही नूकसान झाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित पून्हा बिघडल्याचे चित्र आहे.

Web Title: Thunderstorm with hail in Bodhgaon Babre area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे