धुळे : महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानेच समाविष्ट झालेल्या वलवाडी येथील दैठणकर नगरातील सार्वजिनक शाैचालयांची दुरावस`था झाली असून दुरुस्ती करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वलवाडीतील दैठणकरनगर हा शंभर टक्के दलित वस्तीचा परिसर आहे. याठिकाणी १० ते १५ वर्षांपूर्वी शाैचालये बांधण्यात आली आहेत. त्यानंतर त्यांची दुरुस्ती झाली नाही. सध्या या शाैचालयांची अवस`था अतीशय बिकट आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याआधी अनेकदा दुरुस्तीचे मागणी झाली. परंतु पालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही.कोरोनाचा संसर्ग असल्याने स्वच्छता महत्वाची आहे. घाणीचे साम्राज्य, सर्वत्र दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवून रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर कोरोनाची लागण होवू शकते. त्यामुळे या शाैचालयांची त्वरीत दुरुस्ती करावी. अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा आॅल इंडिया पॅंथर सेनेचे धुळे शहराध्यक्ष आकाश बैसाणे, सचिव बापू नागमल, सह सचिव सागर शिरसाठ, संघटक आकाश कदम, छोटू बोरसे, समीर पठाण, शुभम येवले, अमोल शिरसाठ, बंटी वाघ, सागर बच्छाव, विशाल रायसिंग, मनोज देवरे, विशाल शिंदे, प्रशांत अहिरे, शोभा मोरे, अक्षय दाणे, सागर बैसाणे, सागर मोहिते आदींनी दिला आहे.शहरातील शाैचालयांची अवस्था बिकटधुळे शहरातील शाैचालयांची अवस्था अतीशय बिकट असल्याचे चित्र आहे. शाैचालयांची दुरावस्था तर झालीच आहे. परंतु वर्षानुवर्षे या शाैचालयांमध्ये पाण्याची सुविधा नाही. नागरिक स्वत: पाणी घेवून जातात. शिवाय नियमीत स्वच्छता केली जात नसल्याने रहिवाशी वस्तीमध्ये दुर्गंधी पसरलेली असते.
स्वच्छतेसाठी नागरिक झिझवताहेत पालिकेचा उंबरठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 22:49 IST