शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सेंधव्याच्या आरोपीकडून जिवंत काडतूसासह तीन पिस्तुल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:26 IST

धुळे पोलिसांची कारवाई : मोहाडीसह विशेष पथकाची कामगिरी

ठळक मुद्दे६ जिवंत काडतूसासह तीन पिस्तुल जप्तसेंधव्याच्या आरोपीला धुळ्यात पकडलेधुळे पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील घेगाव येथील राजू सुरसिंग पवार (४०) याला लळींग टोलनाक्याजवळील एका हॉटेलसमोर मंगळवारी रात्री ११ वाजता पकडण्यात आले़ त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात ३ पिस्तूल, ६ जिवंत काडतूस असा एकूण ९० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला़ संशियत राजूला पोलिसांनी अटक केली असून  याप्रकरणी बुधवारी पहाटे मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात घातक शस्त्र शोध मोहीम सुरू आहे़ या मोहीमेंतर्गत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळींग टोलनाक्याच्या पुढे एका हॉटेलजवळ एक व्यक्ती बंदूक विक्रीसाठी आला असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली़ माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, मोहाडी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस कर्मचारी मोहम्मद मोबीन,  रफीक पठाण, राहूल सानप, कबीर शेख, आरीफ पठाण, बिपीन पाटील, प्रभाकर ब्राह्मणे, राजेंद्र मराठे, जितेंद्र वाघ या पथकाने लळींग टोलनाका परिसरातील हॉटेलजवळ सापळा लावला़ मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती हातात काळ्या रंगाची बॅग घेवून रस्ता ओलांडत असताना पथकाला दिसला़ त्या व्यक्तीला पकडण्यात आले़ त्याची विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली़ त्याची अधिक चौकशी केली असता त्याने राजू सुरसिंग पवार (४०, रा़ घेगाव, ता़ सेंधवा जि़ बडवानी, मध्यप्रदेश) असे सांगितले़ त्याची अंगझडती आणि बॅगची तपासणी केली असता बॅगेत तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूस आढळल्याने ती जप्त करण्यात आली़ राजू पवार याला अटक करण्यात आली असून बुधवारी पहाटे त्याच्याविरोधात मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस