शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

लळींग धबधब्यात तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:34 IST

दोघांचे मृतदेह सापडले : तिसऱ्याचा शोध सुरूच

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्यानजिक लळींग येथील धबधब्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ सायंकाळी उशिरापर्यंत मदतकार्य सुरु असल्याने दोघांचे मृतदेह हाती लागले़ एकाचा शोध घेण्याचे काम अंधारामुळे थांबविण्यात आले़ तिघांपैकी एक अमळनेर तालुक्यातील पडासदळे गावातील आहे़मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्यानजिक लळींग येथील लांडोर बंगला परिसरात धबधबा आहे़ या भागात बºयापैकी पाऊस झाल्याने धबधब्याला पाणी आले आहे़ पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ७ ते ८ मित्र एकत्र आले आणि त्यांनी लळींग धबधबा गाठला़ पाण्यात पोहत असताना त्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे एका पाठोपाठ तिघे बुडाले़ मयतांमध्ये देवपुरातील जीटीपी स्टॉप परिसरातील अंबाजी नगरात राहणारा रोहित कोमलसिंग गिरासे (२०), अमळनेर तालुक्यातील पडासदळे येथील शुभम प्रेमराज पाटील (२०) यांचे मृतदेह सापडले. तर शुभम अनिल चव्हाण (रा़ अभियंता नगर, धुळे) याचा मृतदेह सापडलेला नाही़ अन्य ४ ते ५ जणं या दुर्घटनेत वाचले आहेत़ हा प्रसंग पाहून त्यांच्या मनाला जबदरस्त धक्का बसला असून त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत़पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखलघटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक सचिन हिरे, मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनचे पथक घटनास्थळी पोहचले़ त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली़सेल्फीने घेतला बळीपळासदळे येथील शुभम पाटील हा पवन पाटीलसोबत त्याच्या बहिणीच्या घरी शेंगा द्यायला गेला होता. पवनने आपल्या अभियांत्रिकीच्या मित्रांना लळिंगला बोलविले. धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढत असतांना तिघांचा पाय घसरला अशी माहिती मिळालेली आहे.रोहितच्या जाण्याने अंबाजीनगर सुन्नलळींग धबधब्यात बुडून मृत्युमुखी पडलेला रोहित गिरासे हा एकलुता असल्याने गिरासे कुुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला़ रोहितच्या अचानक जाण्याने तो राहत असलेल्या अंबाजी नगर सुन्न झाले़ शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील कोमलसिंग रामसिंग गिरासे हे गेल्या १० वर्षापुर्वी धुळ्यात स्थायीक झाले होते़ ते भाजीपाल्याचे एजंट असून कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचे रोहित ट्रेडींग कंपनीचे नावाचे दुकान आहे़ त्यांचा मुलगा रोहित हा घरात एकलुता होता़ अत्यंत मिळावू व शांत स्वभावाचा रोहित हा श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या विज्ञान शाखेत तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता़ त्याला एक बहिण असून तिने अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे़ तिचा साखरपुडा झाला असून लग्न ठरलेले होते़ त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते़ अशातच ही दुर्घटना घडल्यामुळे आनंदावर एकप्रकारे विरर्जन पडले़ परिणामी अंबाजीनगर सुन्न झाले़

टॅग्स :Dhuleधुळे