शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

आठ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाबमधील तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:45 IST

शिरपूर : पंजाब येथील तीन संशयिताना मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेभागालगत आठ पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, १५ हजार रोख रक्कमसह ...

शिरपूर : पंजाब येथील तीन संशयिताना मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेभागालगत आठ पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, १५ हजार रोख रक्कमसह पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तीनही संशयिताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास केली.पंजाब राज्यातून काही संशयित हे अग्निशस्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या भागात आल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. लागलीच पथकातील नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी वळवी यांच्या पथकाने पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरुवात केली.पोलीस पथकाने महाराष्ट्र - मध प्रदेश सीमाभागातील वरला खंबाळे रोडवर गस्त व तपासणी करीत असताना साडेतीन वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरला बाजूकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची कार येताना दिसली. सदर कारचा संशय आल्याने कार थांबविण्यात आली. या कारमध्ये बसलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये आठ देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळून आले.पकडलेल्या संशयितांमध्ये सुखविंदरसिंह प्रकाशसिंह शीख (२१, रा. बुलेरीयन, पंजाब) लवदीपसिंह दलजितसिंह जाट (२३, रा़ कोटईशिका, ता. धरमकोट, जि. मोघा, पंजाब), दरजनसिंह बलविंदसिंह जाट (३०, रा. गुरु तेगबहाद्दर नगर, पंजाब) या तिघांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीतून आठ पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, ३ मोबाइल व १५ हजार रोख व कार असा एकूण पाच लाख ३२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत तिघांना अटक केली आहे. जप्त केलेले पिस्तूल हे वरला, जि.बडवाणी, मध्य प्रदेश येथून राजूनामक व्यक्तीकडून खरेदी केले असून, हे पिस्तूल पंजाब येथे स्वत:करिता बाळगण्यासाठी नेणार असल्याचे सांगितले.पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनेचा तपास करीत आहेत.